नागेश कांबळेंच्या आंदोलनाला यश ; अखेर ” त्या ” प्राचार्याला अटक
करमाळा समाचार

एका महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. लक्ष्मण पाटील यांनी त्याच महाविद्यालयातील अनुसूचित जातीच्या महिला कर्मचाऱ्याच्या केबिनमध्ये विनयभंग केला या प्रकरणी त्या प्राचार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु संबंधित प्राचार्यास अटक केली जात नव्हती. त्यामुळे आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र संघटक नागेश कांबळे यांनी काढलेल्या मोर्चाला यश आले असून संबंधित प्राचार्यास पोलिसांनी अटक केली आहे.

महाविद्यालयातील प्रा. लक्ष्मण पाटील यांनी त्याच महाविद्यालयातील कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्यामुळे ॲट्रॉसिटी तसेच विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु प्राचार्यांना अटक केली जात नसल्याने त्या विरोधात पश्चिम महाराष्ट्र संघटक नागेश कांबळे यांनी मोठा मोर्चा करमाळा शहरातून काढण्यात आला व संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करावी असे निवेदन दिले होते.
सदर प्रकरणात अटकेची तरतूद असून न्यायालयाला जामीन देण्याचे अधिकार आहेत. त्यापूर्वी त्यांना अटक करून न्यायालयात हजर करावे अशी मागणी कांबळे यांच्याकडून करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात संबंधित प्राचार्य हे बिंधासपणे फिरत होते. शिवाय महाविद्यालयात झालेल्या 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने ही प्राचार्य हजर होते. त्यानंतर कांबळे यांच्या वतीने 18 ऑक्टोंबर रोजी तहसील कार्यालयावर भव्य हलगीनाद आंदोलन करण्यात आले. त्यानंतर सदरचे यश मिळाल्याचे दिसून येत आहे.


