करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

पांडे शिवारात मिळालेल्या मृतदेहावरून शंका कुशंका ; हत्या की आत्महत्या शोध सुरू

करमाळा समाचार

करमाळा पोलीस ठाणे हद्दीमध्ये पांडे शिवारात देवीचामाळ परिसरात २३ ऑक्टोबर रोजी एका साधारण पन्नास वर्षीय पुरुषाचे मृत शरीर गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आले आहे. त्याची सध्या आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. परंतु नेमके ते मृत शरीर कोणाचे व त्या ठिकाणी कसे आले हे कोणालाच माहीत नाही. त्यामुळे आता शंका कुशंका निर्माण होत आहेत.

मागील सात दिवसांपासून सदरचे मृत शरीराचे शोध लागला नसल्याने पोलीस तपास वेगवान सुरू आहे. परंतु अद्यापही त्याची माहिती मिळत नाही. सदरचा अनोळखी पुरुषाचे वय साधारण ४९ ते ५० असून त्याने गळफास घेतलेले आहे का ? त्याला कोणी लटकवलेले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सदरचा मृतदेह हा लटकलेल्या अवस्थेत मिळून आला आहे. याची करमाळा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

तरी सदर अनोखी पुरुष मयताचा आपले पोलीस ठाणे हद्दीत तपास सुरू असून आपल्या भागातील सदर वर्णनाचा कोणता व्यक्ती अपहरण किंवा हरवलेला आहे का ? याची चाचपणी करावी व करमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग किंवा करमाळा पोलीस ठाण्याची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE