करमाळा तालुक्यात बोगस डॉक्टरवर कारवाई ; छाप्यात बनावट पदवी आणि इलाजाचे साहित्य औषधे जप्त
करमाळा समाचार
तालुक्यातील पुनवर गावातील एका दवाखान्यात कोणत्याही मान्यताप्राप्त वैदयकीय पदवी नसताना वैद्यकीय व्यवसाय करून पेशंट कडुन फी घेवुन फसवणुक करीत असल्याच्या कारणावरुन वैद्यकीय पथकाकडुन छापा टाकुन बंगाली बनावट डॉक्टरवर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा छापा दि ३० रोजी दुपारी दिड च्या सुमारास गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम व वैद्यकीय अधिकारी महेश्वर काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली टाकण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहीती अशी की, मौजे पुनवर, ता. करमाळा येथे बोगस डॉक्टर हा दवाखाना चालवित आहे अशी माहीती मिळाल्याने गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, समुदाय आरोग्य अधिकारी अक्षय जोरी, पोलिस हवालदार आरकिले, चालक सागर सोरटे हे दुपारी दिड च्या सुमारास पुनवर गावातील समीर मंडल यांचे दवाखान्यात गेले असता तेथे कोणत्याही दर्शनी भागात वैदयकीय पदवी अगर पदवी प्रमाणपत्र व नोंदणी प्रमाणपत्र आढळुन आले नाही.
तसेच दवाखान्यात रुग्णतपासणी करीता टेबल व कॉट व वैदयकीय साहीत्य, इंजेक्शन गोळ्या व सलाईनचे बॉटल आढळुन आले आहेत. सदर संशयित बोगस डॉक्टर समीर मंडल याने चालवित असलेल्या बोगस दवाखान्याचे ठिकाणचा घटनास्थळ पंचनामा करून पंचनाम्याच्या वेळी औषधे सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे औषध व इंजेक्शनचे पंचनामा करून जप्त केले आहे. सदर डॉक्टर यांना पंचांसमक्ष विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे नाव सांगितले.

समीर मंडल, रा. बारासाल, पश्चिम बंगाल या बनावट डॉक्टर वर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेश्वर भगवान काटकर, वय २७ तालुका वैदयकीय अधिकारी करमाळा यांनी तक्रार दिली आहे. नमुद बोगस डॉक्टर समीर पूर्णा मंडल याचेकडे कोणतीही वैध नोंदणी आणि शैक्षणिक पात्रता नसताना MEDICAL PRACTITIONER ACT 1961 चे कलम ३३ नुसार शिक्षेस पात्र आहे. तसेच स्वतः मान्यताप्राप्त वैद्यकिय व्यवसायीक नसताना तसे भासवुन वैद्यकिय व्यवसाय करुन पेशंटकडुन पैसे घेत असल्यामुळे भारतीय न्याय संहीता कलम ३१९ (२), ३१८(४), सह महाराष्ट्र वैद्यकिय अधि. कलम ३३ प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
