करमाळासोलापूर जिल्हा

माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी घेतली मोठ्या नेत्याची भेट ; पक्षातुन सक्रिय काम करण्याचे संकेत

करमाळा समाचार 

राज्याचे महसूल मंत्री तथा काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते ना . बाळासाहेब थोरात यांची नुकतीच माजी आ जयवंतराव जगताप यांनी भेट घेतली. यावेळी ना .थोरात व माजी आ. जगताप यांच्यात २५ मिनीटे बंद खोलीत चर्चा झाली .

या चर्चेचा तपशील जरी समजू शकला नसला तरी ना . थोरात यांनी माजी आ. जयवंतराव जगताप यांना काँग्रेस पक्षाचे सक्रियपणे काम करणे विषयी सूचना करून राज्य शासन व काँग्रेस पक्ष जगताप यांच्या पाठीशी ठामपणे राहील अशी ग्वाही ना . थोरात यांनी दिल्याचे समजते.

यशवंतराव चव्हाण यांचे कारकिर्दीत ना . थोरात यांचे वडील सहकार महर्षि भाऊसाहेब थोरात व माजी आ. जगताप यांचे वडील देशभक्त नामदेवराव जगताप यांचे अतिशय स्नेहाचे व मित्रत्वाचे संबंध होते .

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE