मी कारखाना 7 वर्षात उभा केला यांना डिस्टलरी ला १३ वर्ष लागली

प्रतिनिधी- सुनिल भोसले

आदिनाथ व मकाई सहकारी साखर कारखाने यांचे एन पी ए खराब आसल्याने त्यांना लोन मिळणे अ अवघड आहे याला सत्ताधारी नेतृत्व जबाबदार आहे अशी माहिती मकाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक व माजी चेअरमन अप्पासाहेब झांजुर्णे यांनी दिली आहे.


झांजुर्णे म्हणाले, बागलांनी मकाईसह इतर संस्था हडप केलेल्या आहेत. त्यांनी स्वतः तालुक्यात काहीच केले नाही. मी मकाई कारखान्याचा चेअरमन असताना राष्ट्रीय पातळीवर पारितोषिके घेतले होते. कारखाना सात वर्षात उभा केला होता. आता त्यांनी डिसलरी उभा करायला दहा वर्ष लागली आहे. आदिनाथच्या कर्मचाऱ्यांना त्यावेळेस फरक दिला होता. त्यांनी कारखान्याच्या शाळेसाठी पंचवीस लाख रुपये दिले होते. आज हे कर्मचारी आत्महत्या करत आहे. त्यांच्या महिला दुसऱ्यांच्या रानात खुरपायला जात आहे. त्यांनी जगताप, मला, पवार साहेबांच्या पक्षाला धोका दिला आहे. आता शिवसेनेला धोका देण्याचा प्रयत्न दिसत आहे. बागल यांनी देर आये दुरुस्त आये बागल हे देशाचे नेते शरदचंद्र पवार यांना भेटुन आदिनाथ व मकाईला मदत करा म्हणून भेटले आहे. आदिनाथ व मकाई दोन्ही कारखाने चालले पाहिजे ही आमची भूमिका आहे. परंतु यांचे एन पी ए खराब झाले आहे. कुठल्याही बँका यांना कर्ज दयायचे म्हंटले कि विचार करावा लागत आहे. याला कारण बागल नेतृत्वहीन जबाबदार आहे. ते आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षात येण्यासाठी प्रयत्न करत आहे परंतु आता काय उपयोग असे मकाईचे संस्थापक झांजुर्णे यांनी सांगितले आहे.

DMCA.com Protection Status
error: Don\'t try to copy. Content is protected !!