करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील रणरागिणीचा पोलीस खात्यात डंका ; सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानीत

करमाळा समाचार –संजय साखरे

मूळच्या करमाळा तालुक्यातील राजुरी गावच्या असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे ( झिंझुर्के) यांना महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांच्या वतीने राज्यातील सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पोलीस पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील तेरा वर्षीय लहान बालिके वर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला होता . शिराळा पोलीस स्टेशनच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक सुप्रिया दगडू दुरंदे ( झिंझुर्के) यांनी आरोपीला तात्काळ अटक करून कौशल्यपूर्ण तपास केला . त्यानंतर थोड्याच दिवसात इस्लामपूर सत्र न्यायालयाने आरोपीला वीस वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावून पीडित कुटुंबाला न्याय दिला.

*सर्पदंश झालेल्या शेतकरी मजूर महिलेच्या मदतीला शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आला धावून*
https://karmalasamachar.com/the-shiv-sena-rushed-to-the-medical-aid-room-to-help-a-woman-farmer-who-was-bitten-by-a-snake/

या कौशल्यपूर्ण तपासाच्या कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकाच्या वतीने सोमवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पोलीस या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. सदरचा पुरस्कार त्यांना सी.आय.डी चे अतिरिक्त पोलीस महासंचालक रितेश कुमार यांच्या हस्ते देण्यात आला. या कामगिरीबद्दल पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे यांचे राजुरी ग्रामस्थांतर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE