कृषिकन्या स्वाती तळेकर यांचे देलवडीत कृषी विषयक मार्गदर्शन
करमाळा समाचार
विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालया विळद घाट, अहमदनगर या कॉलेज ची विद्यार्थिनी (कृषिकन्या ) स्वाती भाऊसाहेब तळेकर ही कृषी जागरूकता व कृषी कार्यानुभव विषयांतर्गत देलवडी तालुका करमाळा जि.सोलापूर येते आधुनिक शेती, खते ,बी -बियाणे, माती परीक्षण , सेंद्रिय शेती , माती परीक्षण , औषध फवारणी ह्या विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. तिचे गावात ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांनी स्वागत केले.

यावेळी सरपंच बापू पवार,विजय तळेकर, नवनाथ ढवळे,संजय तळेकर ,अशोक ढवळे सर ,गणेश काळे, अविनाश काळे ,संकेत तळेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. नवीन कृषी धोरण व तंद्रज्ञान यांच्या आधारे शेतकऱ्यांना सखोल माहिती देऊन त्याचे प्रत्यक्षिक ती शेतकऱ्यांना देणार आहे . ह्या उपक्रमातून आधुनिक शेतीला दिशा मिळेल असे तळेकर हिने सांगितले . ती देलवडी येथील रहिवासी आहे .

या उपक्रमात तिला प्राचार्य डॉ .एम. बी .धोंडे,उपप्राचार्य डॉ.एच एल शिरसाठ, कार्यक्रम समनव्यक प्रा. के. एस .दांगडे,डॉ. शिरुरकर, प्रा.एस बी. डमाळ, प्रा.एस .व्ही भोसले.प्रा. पी.सी ठोंबरे,प्रा. एस. एस मानकर, तसेच इतर कृषी विषय तज्ञांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे कृषिकन्या ने सांगितले.