वांगी येथील वाळु साठ्यावर पोलिसांचा छापा ; दोन जणांवर गुन्हा दाखल
करमाळा समाचार

करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक 30 एप्रिल रोजी वांगी नंबर 2 तालुका करमाळा येथे उजनी जलाशयाच्या कडेला अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर टाकलेल्या छाप्यांमधून आठ ब्रास वाळू साठा व दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.

पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जेऊर दूरक्षेत्र येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, पोलिस ना. गणेश शिंदे यांच्या पथकाने यांच्या पथकास संबंधित ठिकाणी जाण्यास सांगितले.
त्यावेळी वांगी नंबर 2 येथील दादा दत्तू सातव व हनुमंत हरिदास भानवसे यांनी आठ ब्रास वाळू साठा करून ठेवला होता. त्यांच्यावर कारवाई करत दोघांनाही ताब्यात घेतले व आठ ब्रास वाळू जप्त केलेली आहे. सदर ची कामगिरी उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे व श्री कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलिस नाईक गणेश शिंदे हे करीत आहे.
