
फेन्सिंग स्पर्धेत महेश रवींद्र तेलतुंबडे याचे दैदिप्यमान यश
करमाळा समाचार – दिनेश मडके
महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन च्या अधिपत्याखाली दुधारे स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने १४ते १५ मार्च २०२० दरम्यान ११वी मिशन २०२४ मिनी ऑलिंपिक फेंसिंग अजिंक्य स्पर्धेचे आयोजन नाशिक याठिकाणी करण्यात आले होते तरी सोलापूर जिल्हा करमाळा तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थी महेश रवींद्र तेलतुंबडे याने या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावून सोलापूर जिल्हा करमाळा तालुक्याचे नाव उंचावले आहे त्याला पुढील स्पर्धेसाठी महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश काटुळे सर सोलापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष दीपक शिंदे सर सोलापूर जिल्हा स्टार फेन्सिंग क्लबचे अध्यक्ष पवन भोसले सर व वीर शिवाजी तलवारबाजी ग्रुपचे अध्यक्ष नागनाथ बोळगे सर , गणेशभाऊ करे-पाटील संस्थापक यश कल्याणी सेवाभावी संस्था
करमाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांचे मार्गदर्शन लाभले.
