Uncategorized

संतोष वारेंचा खा. सुळेंसोबत प्रवास ; घरी भेट दिल्यावर चर्चा रंगल्या

करमाळा समाचार

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या (रविवारी) सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या. कुर्डूवाडी येथील सभा संपल्यानंतर तेथून नगरकडे जाताना त्यांनी राष्ट्रवादीचे करमाळा तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या घरी भेट दिली आहे. विशेष म्हणजे कुर्डुवाडी पासुन करमाळा पर्यत वारे यांनी सुळेंच्या गाडीतच प्रवास केला. यावरुन वारे यांचे राष्ट्रवादीत वजन जास्त आहे हे दिसुन येत आहे. तर पुढची धुरा वारेंकडेच असेल अशा चर्चा रंगल्या आहेत.

यावेळ सुळे वारे यांच्या निवासस्थानी थांबल्या. तेथे काही कार्यकर्त्यांशी त्यांनी संवादही साधला. रात्री १० वाजताच्या सुमारास त्यांनी वारे यांच्या निवासस्थानी भेट दिली, कुर्डूवाडी येथील सभेसाठी तालुकाध्यक्ष वारे हे तालुक्यातील कार्यकर्ते घेऊन पोहोचले होते. त्यानंतर माघारी येत असताना तालुक्यातील इतर घडामोडी बाबत वारे यांनी सविस्तर चर्चा केल्याची माहिती स्वतः त्यांनी दिली.

अजित पवार यांचा गट वेगळा झाल्यापासून तालुक्यातील बरेचसे पदाधिकारी हे त्यांच्यासोबत गेले आहेत. पण तरीही वारे व इतर काही कार्यकर्ते अजूनही शरद पवार गटाकडेच आहेत. त्यांना पक्ष ताकद देतोय का ? वारे सारख्या नेत्यांना ताकद दिल्यास येणाऱ्या निवडणुकीत युवकांच्या हाती राष्ट्रवादीची धुरा दिसेल असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE