बाजार समीती संचालक पवारांच्या राजीनाम्यानंतर देवकर यांची निवड
करमाळा
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महिला सदस्या साधना पवार यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे बाजार समितीच्या महिला राखीव सदस्य पदाची जागा रिक्त होती .सदर रिक्त जागेवर केम येथील सौ मनीषा देवकर यांची निवड करण्याचा निर्णय बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी घेतला .बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मनीषा बाळासाहेब देवकर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
यावेळी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अपर्णा यादव, उपसभापती शैलजा मेहेर ,संचालक शंभूराजे जगताप, नवनाथ झोळ, सागर दौंड ,तात्यासाहेब शिंदे, रामदास गुंडगिरे, बाळासाहेब पवार, कुलदीप पाटील, काशिनाथ काकडे, मनोज पितळे ,परेश दोशी, वालचंद रोडगे , शिवाजी राखुंडे , जनार्धन नलवडे,महादेव कामटे , नागनाथ लकडेआदी उपस्थित होते. निवडीनंतर सौ मनीषा देवकर यांचा माजी आमदार जयवंतराव जगताप व सहाय्यक निबंधक अपर्णा यादव यांनी सत्कार केला .
तसेच याप्रसंगी येथील सहाय्यक निबंधक अपर्णा यादव यांची बदली कराड येथे जिल्हा उप निबंधक पदी झाले बद्दल त्यांचा शुभेच्छापर सत्कार माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केला . सूत्रसंचालन अशोक नरसाळे यांनी केले तर आभार बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीररसागर यांनी मानले.