2022 कृषी योजना ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न
दिलिप दंगाणे – जिंती –
३३/११ के. व्ही. उपकेंद्र कात्रज येथे मा सहाय्यक अभियंता श्री निकम साहेब व ढेरे साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित 2022 कृषी योजना ग्राहक मेळावा शेतकरी हितास्तव आयोजित करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महावितरण चे श्री सांगळे साहेब (अधीक्षक अभियंता सोलापूर मंडळ कार्यालय ) व श्री जाधव साहेब (उपकार्यकारी अभियंता उपविभाग करमाळा) तसेच उपस्थित जि. प .सदस्या सोलापूर सौ सवितादेवी राजे (वहिनीसाहेब)भोसले यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला.

यावेळी या ग्राहक मेळाव्यात कृषी संजीवनी योजने अंतर्गत पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ करण्यात आला. यावेळी श्री सांगळे साहेब यांनी कृषी संजीवनी योजनेची माहिती देऊन यामध्ये भाग घेण्यासाठी ग्राहकांना आव्हान करण्यात आले. तसेच ग्राहकांचे समस्या व प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. कृषी संजीवनी योजनेची मुदत 31 मार्च 2022 पर्यंत असल्याने या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा व थकबाकी मुक्त व्हावे असे आवाहन केले. तर कात्रज सबस्टेशन मध्ये नवीन ॲडिशनल सब टेशन ची पाहणी केली.
यावेळी कात्रज कोंढार, चिंचोली ,टाकळी खादगाव येथील शेतकरी बांधव उपस्थित होते तसेच कात्रज सबस्टेशन चे कर्मचारी स्टाफ श्री बापूसाहेब गायकवाड (लाईन मेन) श्री सरक एच के ( प्रधान आॅपरेटर) . श्री ऋषिकेश शिंदे (सहा.आॅपरेटर) श्री सागर धायगुडे , श्री चंद्रशेखर धेंडे (सहा.यंत्रचालक) श्री अजय शिंदे (सुरक्षा रक्षक) व अण्णा मोरे इ. यंत्रचालक फिरोज शेख विजय जोशी काका लाईनमन उपस्थित होते.
