आठ ग्रामपंचायतीच्या 72 जागांसाठी 316 अर्ज ; ग्रामनिहाय आकडेवारी
प्रतिनिधी – अमोल जांभळे
तालुक्यातील आठ ग्रामपंचायतच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आज अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. आठ ग्रामपंचायत मधून एकूण ७२ जागांसाठी ३१६ अर्ज दाखल झाले आहेत. तर या अर्जांची छाननी लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी तहसील आवारात सकाळी ११ ते ३ या वेळेत केली जाणार आहे.

तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर त्याची नव्याने निवडणूक जाहीर करण्यात आली. त्यामध्ये वांगी क्रमांक एक, वांगी क्रमांक दोन, वांगी क्रमांक तीन, वांगी क्रमांक चार, वडशिवणे, आवाटी, सातोली व बिटरगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे.

वांगी क्रमांक एक मध्ये ११ जागांसाठी ६० अर्ज, वांगी क्रमांक दोन येथे ९ जागांसाठी ४६ अर्ज, वांगी क्रमांक तीन येथे ९ जागांसाठी ३० अर्ज, वांगी क्रमांक चार येथे ९ जागांसाठी ३६, वडशिवणे येथे ९ जागांसाठी ३३ अर्ज, आवाटी येथे ९ जागांसाठी ५२ अर्ज, सातोली येथे ७ जागांसाठी २२ अर्ज, तर बिटरगाव येथे ९ जागांसाठी ३७ अर्ज दाखल झाले आहे. उद्या छाननी नंतर निवडणुकीची पुढील दिशा ठरणार आहे.