भोसरे गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 4. 92 कोटी निधी मंजुर
करमाळा समाचार – भोसरे
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत व्होळे व २७ गावे या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेमध्ये समाविष्ठ असलेल्या मौजे भोसरे गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ४.९२ कोटी रुपये निधी मंजुर झाला असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की , जलजीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत 27 गावे यांच्यासाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे. कुर्डू, लवूळ ,तडवळे या गावाबरोबरच भोसरे या गावाचा समावेश या योजनेमध्ये करण्यास शासनाने मान्यता दिली असून त्यासाठी नव्याने 4.92 कोटींची तरतूद केलेली आहे. या कामामुळे 36 गावातील मोठ्या ग्रामपंचायतीचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या कामासाठी बंधू आमदार बबनदादा शिंदे यांचे विशेष सहकार्य असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
