करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

दहावीच्या परिक्षेत करमाळ्याचा निकाल ९५.९२टक्के ; शाळानिहाय टक्केवारी

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यातील एकुण ५५ शाळांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये तालुक्याचा ९५.९२ टक्के निकाल लागला आहे. यंदा परिक्षेत ३२९० परीक्षार्थीं पैकी ३१५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याशिवाय तालुक्यातील सोळा विद्यालयांमध्ये शंभर टक्के निकाल लागला आहे. रस्सीखेच चालणाऱ्या शाळांमध्ये यावेळी भारत विद्यालय जेऊर येथील साक्षी शिरसकर ९७. ४० टक्के, तर करमाळा शहरातील डीजी पाटीलची भगवती इंगळे ९७. २० टक्के गुण व कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालय आयुष मोटे ९६.२० टक्के मिळवले आहेत.

शाळानिहाय निकाल पुढील प्रमाणे …
महात्मा गांधी विद्यालय करमाळा ९५.४२ टक्के , भारत हायस्कूल जेऊर ९५.८७ टक्के, उत्तरेश्वर विद्यालय केम ९८.५२ टक्के, साडे विद्यालय साडे ९८.७५ टक्के, नेताजी सुभाष विद्यालय केतुर क्रमांक दोन ९८.६८ टक्के, न्यू इंग्लिश स्कूल वांगी ९७.७७ टक्के, श्री छत्रपती शिवाजी कोर्टी ९७.६१ टक्के, कर्मवीर अण्णासाहेब जगताप ९१.३०, लाल बहादूर शास्त्री विद्यालय सालसे ९६.९६ टक्के, संगमेश्वर संगोबा ९४.२८ टक्के, न्यू इंग्लिश स्कूल चिकलठाण ८८.८८ टक्के, शहाजीराव उमाजीराव भोसले जिंती ९६.२९ टक्के, राजाभाऊ तळेकर केम ९७.५० टक्के, सरस्वती विद्यालय वरकुटे ८९.४७ टक्के, कन्वमुनी विद्यालय कंदर ९२.८५ टक्के, श्री कमलादेवी कन्या विद्यालय करमाळा ८७.६७ टक्के, एम. एन. विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज संतोष नगर जेऊर ९७.९१ टक्के, शरदचंद्र पवार कुंभारगाव ९७.७२ टक्के, श्री सिद्धेश्वर विद्यालय केसरी ८५.९१ टक्के, न्यू इंग्लिश स्कूल वांगी (क्रमांक १) ९७.९५ टक्के,

politics

शरदचंद्र पवार वाशिंबे ९८.९२ टक्के, अजित दादा पवार विद्यालय वडशिवने ९७.५० टक्के, नूतन माध्यमिक विद्यालय केम ९७.५६ टक्के, आदिनाथ माध्यमिक विद्यालय आदिनाथ नगर, शेलगाव ९६.७७ टक्के, विठामाई माध्यमिक विद्यालय गुरसडी ९३.५४ टक्के, धर्मवीर संभाजी विद्यालय गौंडरे ९२.८५ टक्के, श्री संभाजी विद्यालय निंभोरे ९८ टक्के, डॉ. हेगडेवार माध्यमिक विद्यालय गौंडरे ९८ टक्के, वामनराव बदे माध्यमिक ९६.६६ टक्के, प्रगती विद्यालय मांगी ९७ .८७ टक्के, महात्मा ज्योतिराव फुले, मोरवड ९६.९६ टक्के, श्री दिगंबरराव बागल विद्यालय सावडी ९५ टक्के, दिगंबरराव बागल विद्यालय कुंभेज ९७ .९५ टक्के, श्री अवधूत विद्यालय वांगी ७९.१६ टक्के, आर. जी. गाडेकर माध्यमिक विद्यालय पोथरे ७७. ७७ टक्के, माध्यमिक विद्यालय विहाळ ६२.५० टक्के, माध्यमिक विद्यालय पांडे ५४.५४ टक्के, अभिनव माध्यमिक विद्यालय वाशिंबे ८८.८८ टक्के असा आहे.

१०० टक्के गुण मिळवलेल्या शाळा …
पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय रावगाव, नामदेवराव जगताप माध्यमिक विद्यालय झरे, श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय जातेगाव, शारदाताई पवार विद्यालय केम, श्री गिरधरदेवी विद्यालय करमाळा, त्रिमूर्ती विद्यालय टाकळी, भिलारवाडी माध्यमिक विद्यालय भिलारवाडी, न्यू इंग्लिश स्कूल घोटी, श्री संत यादव बाबा माध्यमिक विद्यालय, दत्तकला आयडियल स्कूल केतुर क्रमांक एक, नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल, नोबेल इंग्लिश मीडियम स्कूल , डीजी पाटील स्कूल , गुरुकुल माध्यमिक विद्यालय पांडे रोड करमाळा, कृष्णा इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल आदि शाळांचा निकाल १०० लागला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE