बालदिनानिमित्त स्पर्धेत सांची कांबळेचे यश
करमाळा प्रतिनिधी
बालदिनानिमित्त आयोजित विविध उपक्रम स्पर्धांतर्गत मी नेहरु बोलतोय या विषयावरील व्हिडिओ सादरीकरणात सांची सतीश कांबळे हीचा तालुक्यात तिसरा क्रमांक आला आहे.

सदर स्पर्धांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. पहिली ते दुसरी या लहान गटात इयत्ता पहिलीतील सांचीने हे यश मिळविले आहे. ती शहरातील नगरपरिषदेच्या साधनाबाई जगताप प्रशाला मुलींची शाळा एक मधील विद्यार्थीनी आहे.

या यशानंतर सामाजिक कार्यकर्ते गणेश करे-पाटील, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख छगन शिंदे, मुख्याध्यापक दयानंद चौधरी आदिंसह शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.