करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यात रुग्णांच्या प्रमाणात अपुरी बेड संख्या ; आज सापडले 65 नवे रुग्ण एकाच गावात 24

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यामध्ये आज एका दिवशी 65 नवे रुग्ण आढळले. तर मिरगव्हाण या गावात एकाच दिवशी चोवीस रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे. तर तालुक्यातील उपजिल्हासह खाजगी रुग्णालयात 70 बेड ची कॅपॅसिटी असताना 134 रुग्ण त्या ठिकाणी दाखल झाल्याने अधिकच्या बेडची  आवश्यकता करमाळ्यात भासत आहे.

तालुक्‍यात आज एकूण 164 टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये rt-pcr 58 तर rat 106 टेस्ट झाल्या. त्यामध्ये rt-pcr मध्ये रिपोर्ट 21 बाधित तर 86 निगेटिव्ह व rat टेस्टमध्ये 44 बाधीत व 62 निगेटीव्ह असे एकूण 65 बाधित व 148 निगेटिव रिपोर्ट हाती लागले आहेत.

तालुक्यात कोविड केअर सेंटर येथील बेड वगळता. करमाळा शहरात कोविड हॉस्पिटल मध्ये उपलब्ध बेडच्या प्रमाणात रुग्णांची संख्या अधिक झाले आहे. त्यामध्ये कमलाई हॉस्पिटलमध्ये 25 बेड उपलब्ध असताना तीस रुग्ण दाखल आहेत. उपजिल्हा रुग्णालयात 10 बेड असताना 29 रुग्ण दाखल आहेत. शहा हॉस्पिटल मध्ये दहा बेड असताना 39 रुग्ण दाखल आहेत. लोकरे हॉस्पिटलमध्ये 15 बेड असताना 20 रुग्ण दाखल आहेत. शेलार हॉस्पिटल मध्ये दहा बेड असताना सोळा रुग्ण दाखल आहेत.

ads

वरच्यावर रुग्णसंख्या वाढ ही प्रशासनाची डोकेदुखी बनले आहे. तर आज पासून पुकारण्यात आलेल्या लॉकडॉऊनला तालुक्यातून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असला तरी लोकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या बेड कुठेही शिल्लक नसुन ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. प्रशासनाने बेड वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE