उद्या सकाळी लसीकरण 6 वाजता टोकण वाटप ; तर नवे 88 कोरोना बाधीत
करमाळा समाचार
तालुक्यात एकूण 628 टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 88 बाधित नव्याने मिळून आले आहे. तर एकूण 565 ॲक्टिव रुग्ण आहेत. तर दिनांक 11 साठी 240 लस उपजिल्हा रुग्णालय येथे आले असून दुसर्या डोस साठी सकाळी सहाला टोकण तर साडेनऊ पासून डोस दिला जाणार आहे.

करमाळा शहरासाठी 240 डोस लस प्राप्त झाले आहेत. उद्या दिनांक 11/5/21 रोजी सकाळी 9.30 वाजता फक्त दुसरा डोस (पहिला डोस घेऊन 45 दिवस पूर्ण ) दिला जाईल. उद्या सकाळी 6 वाजता रांगेत उभे असणाऱ्या पहिल्या 240 लाभार्थ्याना पोलीस बंदोबस्तात टोकन वाटप करून लसीकरण करण्यात येईल.
विनाकारण गर्दी करू नये सर्व लाभार्थ्यांचे तापमान व ऑक्सिजन मोजून व गरज वाटल्यास कोविड टेस्ट करून प्रवेश दिला जाईल याची सर्वानी नोंद घ्यावी अशी माहीती वैद्यकीय अधिक्षक अमोल डुकरे यांनी दिली आहे.

आजची ऑक्सिजन बेड परिस्थिती…
कमलाई हॉस्पिटलमध्ये 25 बेड 32 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालयात 10 बेड 29 रुग्ण, शहा हॉस्पिटलमध्ये 10 बेड 42 रुग्ण, लोकरे हॉस्पिटलमध्ये 15 बेड 20 रुग्ण, शेलार हॉस्पिटल मध्ये दहा बेड 16 रुग्ण अशी परिस्थिती आहेत.