E-Paper

लॉकडाऊन अपडेट – निर्बंध काही प्रमाणात शिथील होतील

ऑनलाईन समाचार 

महाराष्ट्रातला लॉकडाउन वाढवण्यात आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात सरसकट लॉकडाउन हटवला जाणार नाही, मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील होतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

आज कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सरसकट लॉकडाउन उठवण्याबाबत निर्णय झाला नसल्याची माहितीही त्यांनी दिली. सध्या आहे त्या निर्बंधांमध्ये काही ठिकाणी शिथीलता आणण्याचा विचार झाला असल्याचं टोपे यांनी सांगितलं. या संदर्भातली नियमावली येत्या दोन दिवसात जाहीर होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.


यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा झाली असून येत्या दोन दिवसांमध्ये लॉकडाउनसंदर्भातली नियमावली जाहीर केली जाईल. मुख्यमंत्र्यांसोबत सर्वच मंत्र्यांचं मत लॉकडाउन लगेच काढणं शक्य होऊ शकणार नाही, यावर एकमत झाल्याचं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE