करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील जलतरणपटू पॅरालिंपिक स्पर्धेसाठी पात्र

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यातील पांगरे येथील दिव्यांग जलतरणपटू सुरेश जाधव याने पॅरालिंपीक स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे. पॅरालिंपिक ऑफ इंडियाचे सरचिटणीस गुरुचरण सिंग यांनी सुरेशची निवड झाली असल्याचे पत्राद्वारे कळवले आहे.

पन्नास मीटर बटरफ्लाय व 200 मीटर वैयक्तिक मिडले या प्रकारात भाग घेणार आहे. ही स्पर्धा 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. जिद्द चिकाटी व महिन्यात या त्रिसूत्रीच्या जोरावर जकार्ता येथे 2018 मध्ये झालेल्या ऑलंपिक मध्ये एशियन गेम मध्ये त्याने स्पर्धेसाठी असलेली पात्रता पूर्ण केले आहे. या स्पर्धेत त्याने 50 मीटर बटरफ्लाय शर्यत 32.71 सेकंदांमध्ये पूर्ण करीत सुवर्णपदक पटकावले होते.

200 मीटर वैयक्तिक मिडले या प्रकारात त्याने कास्य पदक जिंकले होते. हे अंतर त्याने दोन मिनिट 56. 51 सेकंदात पूर्ण केले होते.

त्याच्या कामगिरीवर महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती तर केंद्र शासनाने अर्जुन क्रीडा पुरस्काराने गौरवले आहे. तसेच राज्य शासनाने पुणे येथे जलतरण प्रशिक्षक म्हणून प्रथमश्रेणीची नोकरी दिली आहे. सध्या पॅरालिंपिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवल्याने करमाळा तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE