सावडी येथील कोरोना रूग्णांना डिस्चार्ज
करमाळा – संजय साखरे
सावडी येथे ग्रामपंचायत व लोकसहभागातून श्री हिराभारती महाराज ५०बेडचे कोवीड सेंटर दि.१२/०५/२०२१ रोजी सुरू करण्यात आले.आतापर्यंत सावडी व पश्र्चिम भागातील ६० रूग्णांना दाखल करण्यात आले होते यापैकी ४३ रूग्ण ठणठणीत बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले,९ रुग्णांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आले. तर आज रोजी ८रुगण उपचार घेत आहेत.

या कोवीड सेंटरची दिनचर्या सकाळी सहा वाजता सुरू होते . सकाळी सहा ते सात वाजेपर्यंत श्री गणेश ठेंबे (CRPF) हे सर्व रूग्णांचा योगा घेतात.सव्वासात वाजता जया मचाले आयुर्वेदिक काढा व नाश्ता प्रत्येकी दोन अंडी, व हरभरा,मुग, मटकी यांची मोड आलेली उसळ दिली जाते , आठ वाजता डॉ.रामलिंग शेटे, डॉ प्रतिक्षा भरत अनारसे, डॉ.वैष्णवी आबासाहेब देशमुख, यांची टीम सर्व रूग्णांची तपासणी करतात व त्यावर योग्य ते मार्गदर्शन करून मेडीसीन दिली जातात.अकरा वाजता रुग्णांना जेवण दिले जाते.
दु.दोन वाजता डॉ.मोशीन खान व त्यांची टीम रूग्णांची तपासणी करते सायंकाळी चार वाजता फळे दिली जातात पाच वाजता पुन्हा आयुर्वेदिक काढा दिला जातो साडेपाच ते साडेसहा वाजेपर्यंत रूग्णांना बाहेर शाळेच्या आवारात फेरफटका मारायला लावले जाते.साडेसहा वाजता डॉ.पी.बी मनेरी व त्यांची टीम रूग्ण तपासणी करून मेडीसीन दिली जातात. याशिवाय श्री कांबळे सर रुग्णांचे समुपदेशन करतात.रात्री आठ वाजता रूग्णांना जेवण दिले जाते व रात्री साडेनऊ वाजता हळदीचे दुध दिले जाते. व्यतिरिक्त मुमताज शेख या दिवसातून तीन वेळा साफ-सफाई करतात, प्रत्येक दिवशी सोडीयम- हायपोक्लोराइडची फवारणी केली जाते.पिण्यासाठी जारचे पाणी दिले जाते, महीलांसाठी व पुरूषांसाठी स्वतंत्र स्वच्छ संडास बाथरुमची व्यवस्था आहे आंघोळीसाठी गरम पाणी आहे.

चोवीस तास लाईट उपलब्ध आहे यामध्ये सोलर पॅनल व इन्वर्टरची व्यवस्था आहे.कोवीड प्रोफाईल तपासणी अगदी माफक दरात केली जाते.रूग्णांच्या सेवेसाठी चोवीस तास खासगी रुग्णावाहीका आहे. याव्यतिरिक्त तीन वार्ड बॉय शकीलभाई शेख,बिलाल शेख,अब्दुल शेख, रिसेप्शन राम मचाले असा स्टाफ आहे.
तसेच कोवीड सेंटरचे व्यवस्थापन सावडी गावचे सरपंच भाऊसाहेब शेळके हे जातीने चोवीस तास उपस्थित राहून पाहत आहेत.सावडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नलवडे भाऊसाहेब हे उपस्थित राहून सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहेत. यासाठी अर्जुन (दादा) शेळके व आनंद अब्बड हे वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात तसेच सर्वसहकारी मित्र यांची वेळोवेळी मदत होत आहे.