जेसीबीचे सहाय्याने कब्रस्थानातील कबरी उचकटुन तोडफोड
करमाळा समाचार
आवाटी ता. करमाळा येथील कब्रस्थानातील झाडे काढण्याच्या बहाण्याने बेकायदेशीरपणे कबर उचकटल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना दि १४ रोजी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास आवाटी ता. करमाळा येथे घडली आहे.

मच्छिंद्र सोमनाथ बंडगर, भैरवनाथ सोमनाथ बंडगर , दिपक मोहन बंडगर सर्व रा.आवाटी ता.करमाळा व जेसीबी क्र.एम एच १३,ए एच ०३१४ यावरील अनोळखी चालक यांचेविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शहाबुद्रदीन उर्फ फिरोज अफसर जहागीरदार वय ३७ रा.आवाटी ता.करमाळा यांनी फिर्याद दिली आहे.

आवाटी गावातील मुस्लीम समाजाचे मदारी कब्रस्थान आहे. येथे मच्छिंद्र सोमनाथ बंडगर याचे सांगणेवरून त्याचा भाऊ भैरवनाथ सोमनाथ बंडगर व दिपक मोहन बंडगर रा.आवाटी ता.करमाळा यांनी कब्रस्थान येथील चिल्लारीची झाडे काढण्याचे बहाण्याने बेकायदेशीरपणे प्रवेश केला. जेसीबीचे सहाय्याने कब्रस्थानातील कबरी उचकटुन तोडफोड करून नुकसान करून मुस्लीम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.
तसेच मुस्लिम समाजाचे लोक त्याबाबत विचारणा करीत असताना तुम्ही कोण जेसीबी अडवणारे तुम्ही जर मध्ये आला तर तुमचे हातपाय तोडीन व जिवे ठार मारेल अशी धमकी दिली आहे.