गटशिक्षणाधिकारी श्री जाधव यांची राजेश्वर विद्यालायस भेट
करमाळा संजय साखरे
करमाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री बाबुराव जाधव साहेब यांनी आज राजुरी ता करमाळा येथील श्री राजेश्वर विद्यालयास भेट दिली.यावेळी त्यांनी कोरोना काळात चालत असलेल्या शालेय कामकाजाची माहिती घेतली व आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी त्यांच्या बरोबर कोर्टी केंद्राचे केंद्रप्रमुख आदिनाथ देवकाते उपस्थित होते. कोरोना काळात चाललेल्या शालेय कामकाजावर त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी गटशिक्षणाधिकारी जाधव साहेब यांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल झोळ सर यांनी तर केंद्रप्रमुख देवकाते साहेब यांचे स्वागत सह शिक्षक अवघडे सर यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षक तेर कर्मचारी उपस्थित होते.