करमाळासोलापूर जिल्हा

मराठा आरक्षणप्रश्नी राज्यातील प्रमुख नेत्यांनी खासदारांना संसदेत आवाज उठवण्याचे आदेश द्यावेत

करमाळा समाचार

मराठा आरक्षणप्रश्नी राज्यातील प्रमुख नेत्यांनी खासदारांना संसदेत अवाज उठवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीनभाऊ झिंजाडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, काँग्रेस नेते व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष ना.अशोक चव्हाण व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ई-मेल द्वारे पत्र पाठवले आहे.

याबद्दल अधिक बोलताना नितीनभाऊ झिंजाडे म्हणाले की, कालच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष ना.अशोक चव्हाण यांनी कालच राज्यातील सर्वपक्षीय खासदारांना पत्र पाठवून 50% अरक्षणमर्यादा वाढवण्यासाठी संसदेत आवाज उठवण्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी व मराठा समाजाचा एक घटक म्हणून 21सप्टें2020 रोजी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, 22/11/20 रोजी भाजप राज्यसभा खा.संभाजीराजे भोसले यांचेकडे व 27 मे 2021 रोजी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय एकूण 60 खासदाराना आजवर एकूण 3 पत्र व हे चौथे पत्र लिहून आरक्षण मर्यादा 50%च्या वर आणण्याची मागणी करण्याची केली होती. यावर काही निवडक खासदारांनी लक्ष घालण्याचे कळवलेही आहे.

खऱ्या अर्थाने मराठा आरक्षण प्रश्न शासनाच्या समितीच्या लक्षात आला आहे. याबद्दल मी ना.अशोकजी चव्हाण साहेब व महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन करतो. राज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व इतर पक्ष यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. आता या सर्व पक्षांनी खऱ्या अर्थाने संसदेत या सर्व पक्षांनी मराठा आरक्षणास पाठिंबा द्यावा. यासाठी भाजपचे देवेंद्रजी फडणवीस, शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार साहेब, काँग्रेसचे अशोक चव्हाण साहेब यांनी आपापल्या पक्षाच्या खासदारांना 50 % आरक्षण मर्यादा वाढवणेसाठी आवाज उठवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे.

देशातील मराठा समाजासह अस्तित्वात आलेल्या इतर नवमागास जातींना आरक्षण देने गरजेचे आहे. त्यासाठी संसदेने घटनादुरुस्ती करून आरक्षण मर्यादा 50%च्या वर आणावी व गरज पडल्यास आरक्षणाची फेरमांडणी करून खऱ्या वंचित घटकास न्याय द्यावा. –नितीनभाऊ झिंजाडे, प्रदेश सदस्य,राष्ट्रवादी पदवीधर संघ*

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE