करमाळासोलापूर जिल्हा

शिक्षकदिन विशेष – असा शिक्षक होणे नाही ; आपल्या कलाकारीतुन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी वीस वर्ष खर्ची

करमाळा समाचार 

शिक्षण विभागाने २०१५ पासून सुरू केली. परंतु करमाळा तालुक्यातील मुळचे रावगाव येथील अनिल विठ्ठल काळुंखे (वय ४५) एकमेव असे शिक्षक आहेत जे मागील वीस वर्षांपासून शाळेच्या परिसरातील भिंतीना बोलायला भाग पाडले आहे. रंगवलेल्या भिंतींच्या माध्यमातून अभ्यासक्रमाशी निगडित तसेच सामान्य ज्ञान वाढेल या पद्धतीचा अभ्यासक्रम मुलांच्या सहज लक्षात यावा म्हणून स्वतःच्या हाताने रंगरंगोटी करून सजवत आहेत. आशा उपक्रम शील शिक्षकांमुळे सध्या मुले घडवण्यासाठी नक्कीच मदत होत आहे.

 

करमाळा तालुक्यातील रावगाव येथे काळुंखे गुरुजींचे शिक्षण पूर्ण झाले. लहानपणापासूनच त्यांना रंगकाम, चित्रकला व अभ्यासाची आवड होती. त्यातूनच त्यांनी विविध कलाकार तसेच समाज माध्यम याच्या साह्याने चित्रकलेचे ज्ञान अवगत केल. व ते आवडीने चित्रकलेच्या क्षेत्रात वळले. २००० साली धगटवाडी येथे शिक्षक म्हणून ते कार्यरत झाले. चित्रकलेची आवड तर होतीच ते आवडत त्यांना शांत बसून देत नव्हती.

शाळेत विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर घरी पुन्हा एकदा पाठांतर करून घेणे गरजेचं असतं पण ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबातील मुलांना पुन्हा असे धडे गिरवण्याची संधी क्वचितच मिळते. म्हणून शाळेतील आवारात भिंतींवर चित्र काढण्याचे ठरवले व या चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान व इतर महत्त्वाची माहिती तसेच पुस्तकातील शिकवला जाणारा अभ्यासक्रम हा भिंतीवर रंगवण्यासाठी सुरुवात केली.

 

वीस वर्षाच्या कार्यकाळात काळुंके गुरुजी यांनी तब्बल सहा शाळा बदल्या त्यामध्ये २००२ फुंदेवाडी, २००६ रावगाव, २०१६ मारकड वस्ती, तर २०१८ साली वंजरवाडी येथे ते काम पाहत आहेत. सध्या त्यांच्याकडे मुख्याध्यापक पदची जबाबदारी आहे. तरी ते सर्व काम हताळुन बोलक्या भिंतींनाही वेळ देतात. या सर्व शाळा बदलत असताना सुरुवातीच्या काळात धगटवाडी व लिंबेवाडी याठिकाणी शाळेच्या भिंती रंगवण्याचे त्यांनी ठरवले व पदर खर्चाने त्यांनी या भिंती रंगून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा मिळावा यासाठी प्रयत्न केले.

त्यातूनच विद्यार्थ्यांना भिंतीवरील वाचन करण्याची आवर्जून मुले त्या भिंतीवर अली वाचन करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असत खेळतानाही ती भिंत दिसल्यास त्यावर वाचूनच विद्यार्थी पुढे जात असत. म्हणून ही कल्पना पुढेही अशीच राबवायची गुरुजींनी ठरवले व आजतागायत भिंती वर रंगाच्या माध्यमातून काढलेली चित्र आजही अभ्यासकांना गुरुजींच्या परस्पर काही शिकवून जातात.

 

 

यामुळे या नुसत्या भिंती राहिला नसून त्या आज बोलक्या भिंती झाल्या आहेत. यांच्या या कामामुळे मुले स्कॉलरशीप व इतर स्पर्धा परिक्षात चमकु लागली. त्यामुळे रावगाव येथे गुरुजीना सहकार्य करायला गाव बरोबर आले तब्बल साडे चार लाख खर्च गावकऱ्यांना दिला. मग गुरुजींनी बोलक्या भिंतीवर मर्यादीत न राहता संगणक व इतर माध्यमातून शाळा डिजिटल केली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण निर्माण व्हावे म्हणून काळुंखे गुरुजी यांनी स्वतः च्या हाताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील मोहिमा, लढाया, प्रतिज्ञा यासह सामान्य ज्ञान व अभ्यासाची निगडित अध्ययन करण्यासाठी सूर्यमाला, जलचक्र, औषधी वनस्पती, पाढे, वर्गमूळ, घनमूळ, पदाधिकारी, राष्ट्रीय प्रतीके, ऐतिहासिक चित्रे या सर्वांची अभ्यासपूर्ण माहिती ही शेजारील चौकटीत देत आकर्षक असे चित्र भिंतीवर रंगवली आहेत. तर इथुन पुढे शाळे व्यतिरिक्त गावातीलही भिंती रंगवण्यावर भर देणार असुन त्यातुन सात बारा , गुंठेवारी, शेतीविषयक ज्ञान मुलांसह गावकऱ्यांना मिळावे म्हणुन गावातील भिंती रंगवणार असल्याचे अनिल काळुंखे गुरुजींनी सांगितले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE