करमाळ्यातील गाडीचालकाला दुचाकीने चुकांडी दिल्याने गाडी उजनीच्या पाण्यात
करमाळा समाचार – दिलीप दंगाणे
करमाळा शहरातील एक स्विफ्ट कार कोंढार चिंचोली पासून काही अंतरावर उजनी जलाशयात गेली असल्याबाबत माहिती मिळाली आहे. त्या ठिकाणी मच्छिमारांनी एका जणाला गाडीतून बाहेर काढल्याची माहिती स्वतः बापु नगरे व समाधान नगरे नामक मच्छीमारांनी दिली आहे.

करमाळा येथील तांबोळी हा लाल रंगाची स्विफ्ट कार घेऊन जात असताना त्याला एक दुचाकी चकवा दिला. त्यामुळे बिथरलेल्या हा कारचालक कार घेऊन पाण्यामध्ये जाऊन पडला सदरची घटना नऊच्या सुमारास घडली याची माहिती मिळत आहे. तर त्या ठिकाणाहून मासे विक्री करण्यासाठी निघालेल्या नगरे पितापुत्रांनी त्याला पाहिले.

गाडी रस्त्यापासून काही अंतरावर पाण्यात तरंगत असल्याची दिसल्यानंतर दोघेही पितापुत्र पाण्यात उतरले व पाण्यातील चालकाला सुखरूप बाहेर काढले आहे अशी माहिती सध्या मिळत आहे. अधिक माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू असून त्या ठिकाणी पोलीस पाटील पोलीस व इतर सर्व नियंत्रणात पोहोचत आहे. तरी त्याचे नातेवाईक करमाळा येथून त्या दिशेने निघाले आहेत. नेमकं काय घडलं यासंदर्भात अजूनही स्पष्ट सांगण्यात आलं नसलं तरी एकच व्यक्ती गाडीत होता व त्याला सुखरूप बाहेर काढला आहे अशी माहिती मिळत आहे.