करमाळासोलापूर जिल्हा

राजुरीत आठवडा बाजाराचा शुभारंभ

प्रतिनिधी – संजय साखरे 


करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील सुमारे पाच हजार लोकवस्तीचे गाव असलेल्या राजुरी येथे आज आठवडी बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील राजुरी या गावाला उजनी बॅकवॉटर मुळे बऱ्यापैकी समृद्धी आलेली आहे. आठवडा बाजारासाठी या गावातील लोकांना कोर्टी, पारेवाडी , राशिन, वाशिंबे या ठिकाणी जावे लागत होते.

सध्या ऊस तोडी चा हंगाम चालू झाले असल्याने ऊसतोड मजुरांच्या मोठ्या वस्त्या या ठिकाणी उभा राहिल्या आहेत. वर्षातील जवळपास चार ते पाच महिने 40 ते 50 ऊसतोड टोळ्यांचे वास्तव्य या ठिकाणी असते. त्यांच्या दृष्टीने हा बाजार खूप सोयीचा झाला आहे. याशिवाय आजमितीला ग्रामीण भागातील जवळपास 80 टक्के लोकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले असल्याने कोरोना चा प्रादुर्भाव ग्रामीण भागांमध्ये बऱ्यापैकी कमी झाला असल्याकारणाने ग्रामपंचायतीने आठवडा बाजार भरवण्याचा निर्णय घेतला .त्यानुसार आज दुपारी तीन वाजता आठवडी बाजाराचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी सरपंच अमोल दुरदे, ग्रामसेवक रामेश्वर गलांडे, पोलिस पाटील सौ.चिंचकर,उपसरपंच धनंजय जाधव, सदस्य कैलास साखरे, दत्तात्रेय दुरंदे ,संजय जाधव, संतोष दुरंदे, शिवाजी दुरंदे, दत्तात्रेय गरुड, हनुमंत टापरे, नंदकुमार जगताप, दादा बापू साखरे , ज्ञानदेव दूरंडे,मा .सरपंच भानुदास साखरे,उदय साखरे, सुदाम साखरे ,प्रहलाद नावगिरे आदी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE