करमाळासोलापूर जिल्हा

पोफळज येथे होते असलेल्या सीएनजी प्रकल्पाच्या कंपनीला उभारणी पुर्वीच ग्रहण ; अडथळा आणणाऱ्या आठ जणांवर गुन्हे दाखल

करमाळा समाचार 

पोफळज ता. करमाळा येथे पर्यावरण पुरक सी.एन.जी. व ऑरगनिक खत निर्मिती प्रोजेक्ट नावाचे नवीन कंपनी उभा करताना अडथळा केल्याप्रकरणी करमाळा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी फिर्यादी जबाब देविदास हनुमंत वाघमोडे वय 40 वर्ष धंदा शेती रा. पोफळज ता. करमाळा

सदर प्रकरणात फिर्यादी देवीदास यांचे आजोबा विठोबा बापू हजारे यांचे नावावर पोफळज येथील जमीन गट नं 48 मध्ये एकूण 32 एकर जमीन होते. आजोबा सायबराव बापू हजारे हे मयत झाल्यावर पोफळज जमीन गट नं 48 मधील 17 एकर जमीन सन 1994 साली सदर गटाची वाटणी होवून देवीदासची आई शिताबाई हिस सदर जमीनीतील हिस्सा म्हणून 8.5 एकर जमीन मिळाली होती.

त्याचा गट नं 48/1 असा आहे. आजी नागरबाई सायबराव हजारे व मावशी अलकाबाई उकले असे दोघांत 8.5 एकर जमीन वाटणी होवून आले होते. त्याचा गट नं 48/2 असा आहे. चुलत मामा भिवा विठोबा हजारे यांना 7 एकर जमीन वाटणीने मिळाली होती. त्याचा गट नं 48/3 असा आहे. जमीन गट नं 48/4 ही विठोबा बापू हजारे यांनी बबन गेनू हजारे यांना विकली आहे. देवीदासच्या आईच्या नावावर असलेले पोफळज येथील जमीन गट नं 48/1 मधील जमीन हे आईकडून बक्षीसपत्र करून घेवून माझे, देवीदासचे भाऊ गणेश हनुमंत वाघमोडे, भाउ हनुमंत वाघमोडे यांचे नावावर केले आहे.

सध्या जमीन देवीदास व कुटुंबाच्या ताब्यात आहे. त्यांचा 7/12 आहे. त्याबाबत महसुल विभाग अगर न्यायालय यांचा जमीनीबाबत कोणत्याही प्रकारचा आदेश नाही. माझे पोफळज शेतजमीन गट नं 48/1 मध्ये पर्यावरण पुरक सी.एन.जी. व ऑरगनिक खत निर्मिती प्रोजेक्ट नावाचे नवीन कंपनी उभारण्याचे नियोजित होते. सदर कंपनीचे पायाभरणी कार्यक्रम दि. 26/09/2021 रोजी सायंकाळी 06.30 रोजी आयोजित केले होते. त्यावेळी पायाभरणी कार्यक्रमाकरीता करमाळा तालुक्यातील ग्रामउदयोजक व काही सभासद आले होते.

निवडक ग्रामउदयोजक व सभासदासह नियोजित कंपनीचे पायाभरणी पूजन करणेकामी आमचे नमूद शेतात आलो असता तेथे 1) नाना बापू उकले 2) समाधान बापू उकले 3) भिवा विठोबा हजारे 4) अमोल भिवा हजारे 5) राहुल भिवा हजारे 6) अलकाबार्इ बापू उकले 7) बापू विठोबा उकले 8) सागर भिवा हजारे सर्व रा. पोफळज असे मिळून येवून कंपनीचे पायाभरणी ठिकाणी येवून आम्ही कंपनी होवू देणार नाही. सदरची शेती आमची आहे असे म्हणून प्रतिबंध केला होता.

त्यानंतर त्या ठिकाणी देवीदास व कुटुंबीयानी कंपाउंडचे काम करण्यासाठी दगड, खडी नेवून टाकून बांधकाम सुरू केले होते परंतु तुम्ही पोफळज ते कुंभेज फाटा येथील जाणारे रोडवर तुमची जमीन असून आम्हाला रोडवर जमीन नाही आता परत वेगळया वाटण्या करायच्या आहेत. जोपर्यत सगळयांना रोडवर जमीन येत नाही तोपर्यत तुम्ही काम करायचे नाही असे म्हणून फिर्यादी व त्यांचे वडील, पत्नी आश्विनी, कामगार संतोष तायप्पा गुंजाळ व इतरांना नमूद लोकांनी या ठिकाणी काम कराल तर याद राखा तुम्हाला रस्त्यात कोठेही गाठून तुम्हाला संपवून टाकू अशी धमकी दिली.

आमचे शेतात येवून दिली. व सदरचे बांधकाम दि. 29/10/2021 चे दुपारी 12.00 पर्यत चालू करण्यास आटकाव केला आहेअशी फिर्याद दिली आहे. त्यावरुन संबंधित लोकावर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE