दत्तक मुलींपैकी एका अनाथ मुलीचे आण्णासाहेब पवारांकडुन कन्यादान ; पवारांवर होतो कौतुकांचा वर्षाव
करमाळा समाचार
अण्णासाहेब पवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन काल दि २४ रोजी अण्णासाहेब पंडितराव पवार यांनी दत्तक घेतलेल्या दोन मुली पैकी एक अनाथ मुलगी ऋतुजा लोंढे हिचा शुभ मंगल विवाह पार पडला. समाजाचे सामाजिक कार्य म्हणून जयवंतराव जगताप प्रतिष्ठान कंदर अध्यक्ष अण्णासाहेब पंडित पवार यांनी या विवाहासाठी संसार उपयोगी वस्तू व विवाहाचा संपूर्ण खर्च करून एक समाजापुढे नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यांच्या कार्याला कंदर ग्रामस्थांच्यावतीने विवाह प्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध अण्णा कांबळे, मोरे वकील साहेब, रयत क्रांती जिल्हा सरचिटणीस राजकुमार सरडे, निवेदक विठ्ठल तात्या काळे यांनी अण्णासाहेब पवार यांचा सत्कार करण्यात आला. असे सत्कर्म त्यांच्या हातून वारंवार घडो व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी विद्यमान उपसरपंच मौलाना साहेब मुलानी, आदिनाथ चे माजी संचालक नवनाथ शिंदे, कंदरचे मा उपसरपंच कुबेर, अप्पा शिंदे, युवा नेते विजयसिंह नवले, तंटामुक्ती माजी अध्यक्ष संपत काका सरडे, प्रगतशील बागातदार वैजनाथ गुरव, संभाजी राजे लोंढे, युवा नेते विशाल मंगवडे, आबासाहेब सुरवसे, नागनाथ कदम, केम गावचे विद्यमान सरपंच, विकी भोसले, डीसीसी बँकेचे जयंत पाटील साहेब, अंबड चे चेअरमन पितांबर गाडे, माजी उपसरपंच आखलाख जागीरदार, माजी सरपंच प्रतिनिधी इंग्रजीत कदम, ग्रामपंचायत कांतीलाल पवार, सदस्य दीपक घोडकोस, सिटीबा पवार सतीश पवार, बापूसाहेब यादव आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने विवाह स्थळी उपस्थित होते.