करमाळासोलापूर जिल्हा

कुकडी डावा कालव्याच्या पोंधवडी- हुलगे वाडी चारीच्या कामाचा उद्या शुभारंभ

करमाळा समाचार -संजय साखरे


गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या व करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कोरडवाहू क्षेत्र असणाऱ्या गावांसाठी वरदान ठरलेल्या बहुचर्चित कुकडी डावा कालवा अंतर्गत पोंधवडी शाखा कालवा हुलगेवाडी चारी च्या कामाचा शुभारंभ उद्या विहाळ ता करमाळा येथे होणार असल्याची माहिती आमदार संजय मामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

या कामासाठी नऊ कोटी 23 लक्ष एवढा निधी मंजूर झाला असून 6 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता विहाळ तालुका करमाळा येथे करमाळा माढा मतदार संघाचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या शुभहस्ते व माजी आमदार श्री जयवंतराव जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामाचा शुभारंभ होणार आहे.

या कालव्याचा लाभ राजुरी, पोंधवडी, कोर्टी, हुलगेवाडी, विहाळ, कुसकरवाडी, वीट, गोरेवाडी, अंजनडोह, सोगाव, उमरड, मांजरगाव या गावांना होणार आहे .करमाळा तालुक्यातील मोठ्या तलावा पैकी एक असणाऱ्या लघु पाटबंधारे विभागाच्या राजुरी तलावात या चारीतून पाणी सुटणार आहे.

ads

या कार्यक्रमासाठी श्री वि. ग. राजपुत साहेब, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे श्री हे .तू धुमाळ साहेब ,मुख्य अभियंता ,पुणे, श्री संतोष सांगळे साहेब अधीक्षक अभियंता कुकडी सिंचन मंडळ पुणे, श्री रामदास जगताप कार्यकारी अभियंता ,कुकडी वितरण बांधकाम विभाग, कोळवडी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE