Uncategorized

वीजबील भरुनही वाशिंबे ऊपकेंद्रात वीज पुरवठा खंडित शेतकरी संतप्त

वाशिंबे प्रतिनिधी – सुयोग झोळ


वीज बिल भरूनही वाशिंबे ऊपकेंद्रात शेतीपंपाचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला नाही. वाशिंबे ऊपकेंद्रातील अनेक शेतीपंपधारकांनी वीज बिल भरले आहे. परंतु विद्युत रोहीत्रावरील उर्वरित शेतकरी जोपर्यंत वीज बिल भरत नाही तोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत केला जाणार नाही असा पवित्रा महावितरण चे केतूर विभागातील अधिकार्यानी घेतला आहे.

त्यामुळे विज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरू न केल्याने अतोनात नुकसान होत असून परिसरातील केळी, पेरु, फळबागांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तर जनावरांचा चारा पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. याला सर्वस्वी महावितरण कंपनी जबाबदार आहे.

लवकरात लवकर वीज पुरवठा सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा ईशारा शेतकर्यानी दिला आहे. जे शेतकरी वीज बिल भरत नाही त्याला जे भरत आहेत हे शेतकरी कसे जबाबदार असू शकतात. सदर बाब प्रशासनाने लक्षात घेऊन ज्या लोकांनी वीज बिल भरले आहे त्यांचे वीज कनेक्शन जोडून त्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE