E-Paperकरमाळाक्राईमसोलापूर जिल्हा

ऑनलाईन ओळखीतुन फसवणुक ; ॲप वरुन ओळख वाढवत करमाळ्यातील नर्सला सात लाखांचा गंडा

करमाळा समाचार 

भारत मेट्रोमोनी ॲप वर ओळख करून एका नर्सची सात लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सदर प्रकरणात १३ जुन २१ पासुन ते गुन्हा दाखल होई पर्यत टप्प्याटप्याने तब्बल सात लाखांची रक्कम वेगवेगळ्या खाते क्रमांवर पाठवलेली आहे. तर आता खाते क्रमांक व मोबाईल क्रमांकांच्या आधारावर आता संशयीताचा शोध घ्यावा लागणार आहे.

विजय पाटील रा. नेपाळ, अंकिता अग्रवाल रा. गोवा, रबर्ट व्हाईट रा. गोवा व अरुण सिंग रा. मुंबई पोलिस असे संशयीतांची नावे आहेत. मुळातच ही सर्व फसवणुक करणाऱ्यांची टोळी असुन संबंधित नावे ही खरे आहेत की खोटे याचा अजुन तपास होणे बाकी आहे. त्यामुळे मोघम नावांच्या आधारे संबंधिताचा तपास केला जाणार आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की, सुरेखा (वय ४३) रा. करमाळा या प्राथमिक आरोग्य केंद्रावर नर्स म्हणुन काम करतात. त्यांनी भारत मेट्रोमोनी या ॲपवर आपली नोंदणी केली होती. या ॲपच्या माध्यमातून सुरेखा यांची विजय पाटील रा. नेपाळ यांच्याशी ओळख झाली. ओळख येवढी वाढली की स्वतःचे खाजगी मोबाईल क्रमांकावर बोलणी सुरु झाली. त्यानंतर ओळखीचा फायदा उचण्यास सुरुवात झाली.

विजय पाटील यांनी आपण २०१८ मध्ये एका गोव्यातील इश्युरंस कंपनीत ३८ लाख गुंतवले होते ते आता ४८ लाख मिळणार आहेत. पण ते पैसे काढण्यासाठी मला स्थानीक विश्वासु माणसाची गरज आहे. त्यावेळी तुम्ही मध्यस्थी व्हा तुमच्या खात्यावर मी पैसे मागवतो असे सांगितले. त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड व इतर कागदपत्रे मागवले. त्यानंतर गोव्यातुन अंकीता अग्रवाल या नावाने अनोळखी महिलेचा फोन आला तीने कोर्टाची कामे करण्यासाठी ३१ हजार भरावे लागतील असे सांगितले. त्यावेळी सुरेखा यांनी संबंधित रक्कम पाठवली व तिथुनच सर्व खेळ सुरु झाला.

नंतर रबर्ट व्हाईट रा. गोवा यांनी रक्कम घेऊन येणार असल्याचे सांगुन पोलिसांनी गाडी पकडल्याचे सांगितले व पोलिस म्हणुन अरुण सिंग मुंबई हे बोलले त्यांनी गाडी सोडण्यासाठी तीन लाख मागितले. अशाच पद्धतीने प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कारणासाठी वारंवार मागणी करत होते. अखेर सात लाखांची रक्कम पोहच झाली. तरी रक्कम मिळणार नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर सुरेखा यांनी पोलिस ठाणे गाठले व सर्व संशयीतांच्या विरोधात तक्रार केली. यावरुन करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सुरवातीला अंकीताने वकील फी म्हणुन ३१ हजार घेतले. नंतर विजय पाटील याने रिझर्व बॅंकेची प्रोसेसिंग फी भरायला ५० हजार मागितले. नंतर येवढी मोठी रक्कम बॅंकेत येत नाही त्यामुळे व्हॅन मध्ये येतो म्हणुन १लाख ६५ हजार रुपये मागितले. नंतर फायनान्सचा डिलिव्हरी बॉय रबर्ट व्हाईट यांने गाडी मुंबई पोलिसांनी पकडली असे सांगितले. तर पोलिस अरुण सिंग यांनी गाडीत स्मग्लिंग चे सोने असुन गाडी सोडण्यासाठी २ लाख ४० हजार घेतले. नंतर विजय पाटील याने गाडी पोलिसांकडुन आणली म्हणाले व कस्टमने गाडी पकडली सांगुन बीसीडी नसल्यास २ लाख २० हजार दंड भरावा लागत असल्याचे सांगुन पैसे घेतले. नंतर असेच किरकोळ कारणे सांगत काही रक्कम घेतली शेवटी खाते काढण्यासाठी २० हजार मागितले. असेच काही दिवसांनी आपली फसवणुक होत असल्याचे लक्षात आल्यावर तक्रार केली.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE