क्रिकेट सामन्यात कुर्डुवाडीचा मावळा संघ विजेता ; अडौतीस वर्षीय खेळाडुची चमकदार कामगिरी
करमाळा प्रतिनिधी –
छत्रपती संभाजीराजे जयंती निमित्त आयोजीत क्रिकेट स्पर्धेत भूम येथील वारे वडगाव या संघाचा पराभव करीत कुर्डूवाडी येथील मावळा संघाने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. तर तृतीय शिवक्रांती करमाळा तर कर्जत संघाने चतुर्थ पारितोषिक मिळवले आहे. यास्पर्धांचे आयोजन गजानन स्पोर्ट क्लब च्या वतीने करण्यात आले होते.

चार दिवसांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये तब्बल ३० संघांनी सहभाग नोंदवला होता. गाव पातळी, तालुका पातळी व खुल्या अशा वेगवेगळ्या विभागातून सामने खेळविण्यात आले. या मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करत कुर्डूवाडीचा मावळा व भुम तालुक्यातील वारेवडगांव यांचा संघ अंतिम फेरीत पोहचला होता. गुरुवारी सदरचा अंतिम सामना जीन मैदान येथे संपन्न झाला.

या सामनात मावळा कुर्डुवाडी याने वडगाव संघाचा पराभव करीत प्रथम क्रमांक मिळवला. कुर्डुवाडी संघाच्या अडौतीस वर्षीय संतोष नलावडे याने उपांत्य फेरीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील शिवक्रांती करमाळा या संघासोबत शेवटच्या चेंडूवर चौकार खेचून विजय मिळवला. तर अंतिम सामन्यात फलंदाज विठ्ठल चव्हाण यांनी एकतर्फी विजय मिळवून दिला तो सामनावीरही ठरला. मालिकावीर म्हणुन मयुर तळेकर (वारे वडगाव संघ), व उत्कृष्ट गोलंदाज म्हणुन मावळा संघाच्या श्रीकांत पाटील यांची निवड झाली.
अडौतीस वर्षीय संतोष नलावडेची उत्कृष्ट खेळी …
शिवक्रांती संघाने पाच षटकांमध्ये 48 धावांचे आव्हान कुर्डुवाडी संघापुढे ठेवले होते. आव्हान जरी जेमतेम असले तरी शिवक्रांती संघ सोलापूर जिल्ह्यात नावाजलेल्या संघ आहे. यांनी आपल्या गोलंदाजीच्या बळावर कुर्डवाडी मावळा संघाला जखडून ठेवले. चार षटका पर्यंत शिवक्रांती संघाने सामना आपल्या बाजूने झुकवला होता. परंतु अखेरच्या षटकात नलावडे यांनी सहा चेंडूवर 17 धावा केल्या होत्या. त्यावेळी अतिशय संयमी आणि आपल्या अनुभवाचा वापर करून कुर्डूवाडी संघाच्या संतोष नलावडे मी एक हाती या 17 धावा केल्या. त्यामध्ये अंतिम शेवटच्या दोन चेंडूंवर 1 षटकार आणि 1 चौकारांसह सामावेश होता. तसं पाहिलं तर या युवा खेळाडूंच्या खेळात सर्वात जास्त वयाचा तसेच अनुभवाचा खेळाडूही संतोष होता. त्याची बहारदार खेळी प्रेक्षकांची वाह वा खेचून गेली.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी नगरसेवक संजय सावंत, प्रशांत ढाळे, प्रवीण जाधव, बोरगावचे सरपंच विनय ननवरे, रवी माळी, शिवाजी खाडे, दादासाहेब बेंद्रे, शशिकांत देहटे, शिवा माळी, निलेश कांबळे, आनंद जगदाळे, चेतन ढाळे, समीर बागवान आदी उपस्थित होते. तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमित बुद्रुक, विकी भडंगे, बापू सावंत, मिलिंद दामोदरे, नवाज बेग, शाहरुख मुलानी, मुन्ना पठाण , अल्ताफ दारुवाले, कमलेश कदम, अनिकेत कांबळे, रितेश कांबळे, आनंद जगदाळे, प्रवीण बोलभट, शेखर सावंत, इमरान दारूवाले , सचिन गायकवाड, मयूर कांबळे आदींनी परिश्रम घेतले.