करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

मायनस १३ टक्क्याहुन पन्नाशीकडे वाटचाल ; दौंड भागातुन होणाऱ्या विसर्गामुळे उजनीच्या पाण्यात वाढ

करमाळा समाचार -संजय साखरे


संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह शेजारील पुणे आणि नगर या दोन जिल्ह्यांना वरदान ठरलेले उजनी धरण पुणे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने 50% पर्यंत भरत आले आहे .यामुळे उजनीकाठचा शेतकरी सुखावला असून उजनी बॅक वर वॉटर पट्ट्यात आडसाली ऊस लागवडीला वेग आल्याचे दिसून येत आहे.

आज सकाळी सहा वाजता उजनी धरणात दौंड येथून 20960 qusek एवढा पाण्याचा विसर्ग येत असून त्याची टक्केवारी 49.02 इतकी झाली आहे. यावर्षी पुणे जिल्ह्यात लवकरच पाऊस झाला आणि धरणात वेगाने पाणी येण्यास सुरुवात झाली.

यावर्षी उन्हाळ्यात जून मध्ये उजनी मायनस 13 टक्के वर गेले होते मात्र दरवर्षी होती इतकी शेतकऱ्यांची परवड यावर्षी झाली नाही. उजनी धरणातील पाणीसाठा समाधानकारक झाल्यावर त्यावर आधारित असणाऱ्या सर्व उपसा सिंचन व पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होतात याचा उपयोग शेतीसाठी व पिण्याचे पाण्यासाठी होतो.

*सत्तेत येताच शिंदे सरकारकडुन स्थगीती मिळाल्यानंतर आ. रोहित पवार शिंदेंच्या भेटीला ; मिळाले आश्वासन*
https://karmalasamachar.com/after-getting-a-reprieve-from-the-shinde-government-after-coming-to-power-rohit-pawar-meets-shinde-promised/

दरम्यान दरवर्षीपेक्षा यंदा लवकरच धरणात पाणी येण्यास सुरुवात झाल्याने धरणग्रस्त शेतकरी सुखावला असून उजनी बॅक वॉटर पट्ट्यात आडसाली ऊस लागवडीने वेग घेतला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE