आम्ही स्वतःच्या जमीनी देऊन चुक केली आहे का ? ; पुर्नवसन भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न
समाचार टीम
वांगी नं 2 परिसरातील रस्ते प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अक्षरशः चाळण होऊन वाहुन गेले आहेत . वारंवार पाठपुरावा करूनही लोकप्रतिनिधी व प्रशासन याकडे सोईस्कर दुर्लक्ष करताना दिसत आहेत अशा तक्रारी नागरीक करीत आहेत. तर आम्ही स्वतःच्या जमीनी देऊन चुक केली आहे का असा प्रश्न पुर्नवसन भागातील लोक विचारु लागले आहेत.

नागरीक, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यांना प्रचंड ञास सहन करावा लागत आहे.शाळकरी विद्यार्थी ओढ्यातून पाण्यातून वाट काढत शाळा शिकत आहेत. रस्ते संघर्ष समिती वांगी नं 2 यांनी यापूर्वी करमाळा तहसीलदार, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, यांना वेळोवेळी निवेदने दिली. गाव भेट दौ-यावर असलेल्या खासदार साहेबांसमोर वांगी परिसरातील रस्ते व्यथा मांडली. माञ सोयिस्कर दुर्लक्ष केले जात आहे.

यापुर्वीच अंदोलनात लेखी पत्र देण्यापलीकडे कोणत्याही प्रकारची कामे झाली नाहीत. निवेदनाद्वारे येत्या काही दिवसांत परत करमाळा टेंभुर्णी महामार्ग अडवण्यासाठी युवकांना व नागरिकांना भाग पाडू नका अशी प्रशासनाला रस्ते संघर्ष समिती विनंती करत आहे.