सोलापूर जिल्हासोलापूर शहर

जिल्हा परिषद शाळांमध्ये हिंदी सिनेमा दाखवण्याच्या सुचना ; मुख्याध्यापकांना पत्र

करमाळा समाचार (karmala samachar )

आयुष्यात जिद्द, चिकाटी, प्रेरणापासून आणि शिक्षण याचे किती महत्त्वाचे स्थान आहे हे समजण्यासाठी सर्व शाळा मध्ये हृतिक रोशन याने काम केलेला सुपर ३० (super 30) हा सिनेमा विद्यार्थ्यांना दाखवण्यात यावा अशा सूचना गटविकास अधिकारी मनोज राऊत (manoj raut) यांनी दिल्या आहेत.

मंगळवार १७ जानेवारी रोजी प्रत्येक जिल्हा परिषद शाळेने शाळेत असलेल्या स्मार्ट टीव्हीवर सदर सिनेमा विद्यार्थ्यांना दाखवावा अशी सूचना राऊत यांनी दिली आहे. सुपर ३० हा २०१९ मधील भारतीय हिंदी भाषेचा बायोग्राफिकल नाटक चित्रपट आहे.

हा चित्रपट गणिताचे शिक्षक आनंदकुमार आणि सुपर ३० नावाच्या शैक्षणिक कार्यक्रमाच्या जीवनाविषयीचा आहे. आयआयटी ही देशातील यश आणि संपन्नता प्रदान करणारी आणि जीवनमान बदलून टाकणारी व्यवस्था आहे. आयआयटी मध्ये जाणारा माणूस लाखातला एक असतो आणि तिथे गेल्यानंतर स्वतः सोबत सगळ्यांचे आयुष्य बदलून टाकतो.

तेथे जाण्यासाठी महागड्या कोचिंग क्लासेस आणि बुद्धिमत्ता अशा दोन्ही गोष्टी लागतात. बुद्धिमत्ता असूनही केवळ आर्थिक साधन नसल्याने कोचिंग क्लासेसची फी परवडत नसल्याने अनेक मुले मागे राहतात. हे जाणवल्यावर परिस्थिती बदलणाऱ्या आनंद कुमारची (aanand kumar) ही कथा आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेत सदर सिनेमा उपलब्ध करून विद्यार्थ्यांना दाखवण्याबाबत राऊत यांनी आवाहन केले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE