राज्यस्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परीक्षेत मुली नं.१ शाळेचे घवघवीत यश
करमाळा समाचार
करमाळा नगरपरिषदेच्या कै.साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा नं.१ या शाळेतील तब्बल 21 मुलींनी राज्यस्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ता यादीत क्रमांक मिळवून उज्ज्वल यश संपादन करत शाळेच्या नावलौकिकात वाढ केली.

🔖इयत्ता तिसरीतील कार्तिकी सुरवसे हिने (300 पैकी 290) गुण मिळवून राज्यात दुसरा व इयत्ता दुसरीतील समृध्दी साडेकर व आरोही घुमरे यांनी (200 पैकी 188) गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम तर पहीलीतील ईशिता करपे हिने (100 पैकी 92) गुण,दुसरीतील पूर्वा घोलप व राजवैभवी देवकर यांनी (200 पैकी 186) गुण मिळवून जिल्ह्यात दुसरा क्रमांकाने येण्याचा बहुमान मिळवून शाळेची स्पर्धा परीक्षेतील उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली.
🔖गुणवत्ता यादीतील इतर मुली :-
1)भैरवी लटके इ.2 री – केंद्रात पहिला (176/200)
2)समीक्षा थोरे -इ.3 री केंद्रात पहिला (264/300)
3)भक्ती हावलदार- इ.2री केंद्रात चौथा (250/300)

4) सांची कांबळे इ.3री – केंद्रात पाचवा (248/300)
5)श्रद्धा गरड – इ.3 री केंद्रात सहावा (246/300)
6)समृद्धी राखुंडे – इ.3 री केंद्रात सहावा (246/300)
7)सई गिरी-इ.2री केंद्रात सहावा(164/200)
8)श्वेतल चव्हाण-इ.2 री केंद्रात सहावा(164/200)
9)अनुष्का जाधव – इ.2री केंद्रात नववा (165/200)
10) आरोही थोरात – इ.2 री केंद्रात अकरावा – (150/200)
11) क्षितिजा धिंदळे – इ.2 री केंद्रात अकरावा ( 150/200)
12)मनिषा माने- इ.2रीकेंद्रात अकरावा(150/200)
13) संस्कृती वीर- इ.4 थी केंद्रात 4 था (250/300)
14) अस्मिता सिरसट – इ.2 री केंद्रात नववा (234/300)
15) स्वरा उकिरडे- इ.4 थी केंद्रात अकरावा (228/300)
शाळेने मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक वर्गशिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन मुख्याधिकारी मा.बालाजी लोंढे साहेब, प्रशासन अधिकारी मा.अनिल बनसोडे साहेब मुख्याध्यापक तथा केंद्र समन्वयक मा.दयानंद चौधरी सर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.अमृतसिंग परदेशी,उपाध्यक्षा सौ.भाग्यश्री फंड व सर्व सदस्य यांनी केले.