करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

वडीलांच्या निधनानंतर परिस्थितीशी सामना करीत यश संपादन ; कॉग्रेसचे जगताप यांच्या हस्ते सन्मान

करमाळा-

मोरवड ता.करमाळा येथील कु.प्रणाली पोपट मोहोळकर हिने इयत्ता १२ वी मध्ये 91.83 % मार्क मिळवुन नेत्रदिपक यशसंपादन केल्याबद्दल करमाळा तालुका काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. कु.प्रणाली हीने अत्यंत प्रतिकुल परिस्थितुन शिक्षण घेत असताना हे यश संपादन केले.

परिक्षेच्या काही महीने अगोदरच वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अश्या परिस्थितीतही करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता १२ वी चे शिक्षण पुर्ण केले. इंजिनियर क्षेत्रांकडे पुढील शिक्षण करुन UPSC मध्ये स्वताचे करिअर करण्याचा कु.प्रणालीचे ध्येय असुन भविष्यात कसलीही मदत लागली तरी आपण करण्यासाठी तयार असल्याचे आश्वासन प्रतापराव जगताप यांनी तीच्या कुटुंबीयांना दिले.

यावेळी काँग्रेस युवक चे करमाळा शहर अध्यक्ष सुजय जगताप, मोरवड येथील छगन मोहोळकर,गोपीनाथ नाळे उपस्थित होते.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE