त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबच्या योगासन खेळाडुंची विभागीय स्पर्धेसाठी निवड
करमाळा समाचार
10 सप्टेंबर रोजी ज़िल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ज़िल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धा सोलापूर क्रीडा संकुल सोलापूर येथे पार पडल्या. ज़िल्हा स्तरीय योगासन स्पर्धेत ज़िल्हातील भरपूर शाळांनी सहभाग नोंदवला होता.
![](https://i0.wp.com/karmalasamachar.com/wp-content/uploads/2021/12/IMG-20240914-WA0006.jpg?fit=1280%2C720&ssl=1)
त्यात त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब करमाळा च्या खेळाडूनी 14 मुले व 17,19 वर्षाखालील मुलांच्या मुलींच्या गटात सहभाग नोंदविला होता .14 वर्षाखालील ट्रॅडिशनल योगासन या प्रकारात रणवीर सचिन चेंडगे यांने चौथा क्रमांक मिळवला. तसेच 17 वर्षाखालील मुलींच्या गटात राजलक्ष्मी दत्तात्रय सुतार हिने दुतीय क्रमांक मिळवला.
![politics](https://i0.wp.com/karmalasamachar.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241214-WA0010.jpg?w=800&ssl=1)
त्यांच्या या यशमागे त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब चे योगासन कोच सागर शिरस्कर सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. वरील विजयी खेळाडूंची पुणे विभागीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली. वरील दोनी खेळाडूचें करमाळा शहरातून सर्व स्तरातून खेळाडूचे अभिनंदन, कौतूक होत आहे.