करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीची मतदानाची तारीख जाहीर ; स्वाभिमानी व गुरुसेवा आमनेसामने

करमाळा समाचार

वेगवेगळ्या कारणास्तव थांबवण्यात आलेली करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूकीच्या मतदानाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ८ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८ ते ४ या वेळेत महात्मा गांधी विद्यालय येथे मतदान पार पडणार आहे. यावेळी स्वाभिमानी शिक्षक विरुद्ध गुरुसेवा शिक्षक असे दोन शिक्षक पॅनल समोर असणार आहेत. याशिवाय मतमोजणी व निकाल याच दिवशी जाहीर होणार आहे. निवडणूक यंत्रणा व निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिलीप तिजोरे साहेब काम पाहत आहेत

येथील करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित करमाळा या पतसंस्थेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर इतर कार्यवाही पूर्ण करून मतदान मात्र तीस सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आले होते. पण आता सदर निवडणुकीचे मतदानाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 8 ऑक्टोंबर रोजी सदरचे मतदान पार पडणार आहे.

या प्रक्रियेत स्वाभिमानी शिक्षक परिवार पॅनल कडून सर्वसाधारण जागेसाठी –
वसंत बदर, अरुण चौगुले, तात्यासो जाधव, प्रताप काळे, अजित कणसे, निशांत खारगे,
महिला प्रतिनिधी-
पूनम जाधव, वैशाली महाजन,
अनुसूचित जाती जमाती-
सतीश चिंदे,
इतर मागासवर्ग-
साईनाथ देवकर,
भजा विज-
आदिनाथ देवकते

ads

आदि मैदानात आहेत. तर त्यांच्या विरोधात गुरुसेवा शिक्षक पॅनल मधून
सर्वसाधारण मतदारसंघात-
विजय बाबर, धनंजय दिरंगे, राजेंद्र जाधव, तात्यासाहेब जगताप, उमेश पाटील, हनुमंत सरडे
महिला प्रतिनिधी-
मंगल गुंड, सुनीता माळी,
अनुसूचित जाती-
मुचकुंद काळे,
इतर मागास वर्ग –
सुरेश राऊत
भजा विज –
अमृत सोनवणे

हे दोन्ही गट आमने-सामने राहणार आहेत. सध्या या सोसायटीवर स्वाभिमानी शिक्षक परिवाराकडे या संस्थेची सत्ता आहे.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE