लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडुन ‘ सिंह ‘ मैदानात उतरवण्याची तयारी ?
करमाळा समाचार
माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने भाजापाकडे उमेदवारीसाठी रस्सीखेच बघायला मिळत आहे. तर मीच उमेदवार आहे असे सांगितले जात आहे. इतर पक्ष मात्र सयंमी भुमीका घेताना दिसत आहेत. तर माढा लोकसभा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने पक्षातील फुटीच्या पार्श्वभूमीवर नेमका कोणता उमेदवार राष्ट्रवादीची धुरा संभाळेल याकडे लक्ष लागलेले आहे. त्यात मागील वेळचे उमेदवार विद्यमान आमदार संजयमामा (sanjayamama shinde) हे अजितदादा (ajitadada pawar) गटात गेले शिवाय ते आमदार आहेत त्यामुळे शरद पवार गटाला नव्या चेहऱ्याला संधी द्यावी लागणार हे निश्चित असताना राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस अभयसिंह जगताप (abhaysinh jagtap) यांचे नाव चर्चेत येऊ लागले आहे. तर त्यांनी मतदारसंघात भेटीगाठी घेण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.
माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला तरी मागील निवडणुकीत २०१९ मध्ये या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर (ranjeetsinh naik nimbalkar) यांनी मुसंडी मारत लोकसभा विजय मिळवला होता. त्यामुळे सध्या भाजपाची सत्ता माढ्यात (madha loksabha) असल्याने व बरीचशी राजकीय गणिते बदलल्यामुळे भाजपाचा या मतदारसंघावर दावा होत आहे. त्यामुळे जरी राष्ट्रवादीने दोनदा विजय मिळवला असला तरी अजित पवार गट ही जागा लढवण्यासाठी तितकासा इच्छुक नाही असे दिसत आहे. त्यामुळे सदरची जागा भाजपालाच मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या भाजपामध्ये खा. रणजीतसिह नाईक निंबाळकर व धैर्यशील मोहिते पाटील (dhairyashil mohite patil) या नेत्यांमध्ये धुसफूस सुरू असल्याने नेमकी उमेदवारी कोणाला हा विषय गाजत आहे. तर राष्ट्रवादी पक्ष फुटी नंतर इच्छुक चाचपणी घेत आहेत. जुन्या चेहऱ्यापैकी आ. संजयमामा व आ. बबनराव शिंदे बंधु अजित पवारांच्या गटात असल्याने नवा चेहरा शोधावाच लागणार आहे.
माण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अभयसिंह जगताप हे उद्योगपती आहेत. शिवाय त्यांची राजकीय पार्श्वभूमी व कामकाजातील अनुभव त्यांच्या जमेची बाजु आहे. तर जगताप यांनी समाजकारण, राजकारण, मैदानी खेळ खेळणाऱ्या युवकांना प्रोत्साहन, आरोग्य शिबिरे, मल्लविद्यासाठी प्रोत्साहन गोरगरिबांसाठी मदतीचा हात, कोरोना काळातील महत्त्वपूर्ण कार्य, माहिती तंत्रज्ञान प्रमुख म्हणून युवकांचे कार्यशाळा तसेच स्व. बंधू च्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून १४ गावांना मोफत राशन वाटप अशा प्रकारच्या अनेक सामाजिक उपक्रमात जगताप यांनी घेतलेला सहभाग व या कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरचिटणीसपदी केलेली नियुक्ती यामधून त्यांचा लोकांशी कायम संपर्क राहिला आहे. तर सध्याच्या परिस्थितीला ते ज्येष्ठ नेते पवार यांच्या संपर्कात असल्याने माढाची जबाबदारी त्यांच्यावर दिली जाऊ शकते अशी चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगाने त्यांनी भेटीगाठी वाढवल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्याच्या वादाचा फायदा…
माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये करमाळा (karamala), माढा (madha), सांगोला (sangola), माळशिरस (malashiras) यासह सातारा जिल्ह्यातील फलटण (falatan) , माण या दोन्ही विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. सध्या फलटण येथील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तुल्यबळ लढत म्हणून माण तालुक्यातील अभयसिंह जगताप यांच्या नावाची चर्चा आहे. ज्या पद्धतीने राष्ट्रवादीमध्ये फटाफुट झाली आहे. त्या पद्धतीने भाजपमध्ये उमेदवारीवरुन निंबाळकर व मोहिते यांच्या धुसफुस सुरू आहे. निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्यास मोहिते समर्थक सोबत असतीलच असे नाही तर मोहितेंना उमेदवारी दिल्यास शिंदे बंधु सहकार्य करतील याचीही शक्यता कमी आहे. त्यामुळे याचा फायदा राष्ट्रवादीकडून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याने सातारा जिल्ह्यातील उमेदवार देऊन सोलापूर जिल्ह्यातील वादाचा फायदा उचलू शकतील असं दिसून येत आहे.