केंद्रप्रमुख गटकळ यांच्याकडून प्रथमोपचार पेटींची भेट
करमाळा-
तालुक्यातील जातेगाव केंद्राचे
केंद्रप्रमुख रमाकांत गटकळ यांच्या वतीने जातेगाव केंद्रातील सर्व शाळांना प्रथमोपचार पेट्या भेट देण्यात आल्या आहेत.

गटकळ यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीतून एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा, श्री जगदंबा मूकबधिर विद्यालय, सीतामाई परदेशी कन्या प्रशाला आदि शाळातील विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप केले. तसेच प्राथमिक उपचार साहित्य असलेल्या प्रथमोपचार पेट्या जातेगाव केंद्रातील सर्व शाळांना वाटप केल्या. केंद्रप्रमुख गटकळ यांच्या या उपक्रमाचे शिक्षण विभागातील अधिकारी वर्गाने कौतुक केले.
