करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

उजनी पाणलोट क्षेत्रात व घाटमाथ्यावर दमदार पाऊस, वरदायिनी लवकरच प्लस मध्ये

करमाळा समाचार – संजय साखरे

पुणे जिल्ह्यात व घाट माथ्यावर गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणात दौंड येथून 43 हजार 150 क्युसिक एवढ्या वेगाने पाणी येत होते. तर धरणाची टक्केवारी मायनस 14.72 एवढी आहे. दरम्यान पाण्याच्या या वेगामध्ये वाढ होणार असून सोलापूर, पुणे व् नगर या जिल्ह्याची वरदायी नी असलेले उजनी लवकरच उद्याच प्लस मध्ये येण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी अपुरा पाऊस झाल्याने उजनी धरण जेमतेम 60 टक्के भरले होते. त्यामुळे पुणे नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या तीव्रतेला सामोरे जावे लागले होते. यावर्षी ही उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दीर्घकाळ विश्रांती घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती .मात्र गेल्या दोन दिवसापासून घाटमाथ्यावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आनंदा ला उधाण आले आहे.
उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील जवळपास सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरत आली असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास उजनीत येणारी पाण्याची आवक वाढणार असून उजनी लवकरच 100% भरणार आहे.

आडसाली ऊस लागवडीला लागला होता ब्रेक
जुलै महिना संपत आला तरी अजून मायनस मध्ये असणारे उजनी धरण प्लस मध्ये येत नसल्याने उजनी बॅक वॉटर पट्ट्यात आडसाली ऊस लागवडीला ब्रेक लागला होता.की पण आता उघडीप होताच आडसली उसाच्या लागवडी मोठ्या प्रमाणावर सुरू होणार आहेत्. दहा एकर अडसाली ऊस लागवडीसाठी सरी काढून ठेवली असून आता उघडीप् होताच उसाची लागवड चालू करणार असल्याचे पारेवाडी येथील शेतकरी बंडू नवले यांनी सांगितले.

ads

आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार पुणे येथील बंडगार्डन मधून उजनी धरणात एक लाख 5 हजार 538 क्यूसेक एवढा पाण्याचा विसर्ग चालू असून दौंड येथून जवळपास 50,000 एवढा पाण्याचा विसर्ग चालू आहे. बंडगार्डनचा विसर्ग दौंड मध्ये पोहोचण्यास साधारणतः दहा ते बारा तास लागतात. त्यामुळे त्यामुळे आज संध्याकाळी बारा वाजेपर्यंत जवळपास एक लाख वीस हजार ते 30 हजार क्युसक एवढ्या वेगाने दौंड मधून उजनीत पाण्याचा विसर्ग येणार आहे.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE