करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मागच्यावेळी पेक्षा दहा लाखांनी ठेका महाग तरीही सुरु आहे वाद ; ठेक्यावरुन दोन गटात वाद

करमाळा समाचार 

येथील देवीचामाळ परिसरात नवरात्र उत्सवामध्ये खेळणी व पाळणा अशा मनोरंजनाचा ठेका देवीचामाळ येथे दिलेला असताना पुन्हा एकदा देवीचामाळ रस्त्याला दुसरा पाळणा व नियोजन करण्याचे ठरवल्यामुळे देवीचेमाळ ग्रामस्थ व शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यामध्ये वाद होत आहेत. यामुळे प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागून राहिले आहे. तर चिवटे यांनी मागवलेल्या मनोरंजनाच्या खेळ करणाऱ्यांना देवीचामाळ ग्रामस्थांनी रोखले व माघारी पाठवले त्यावरून चिवटे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

करमाळा तालुक्यातील आराध्य दैवत श्री देवीचा माळ येथे कमलाभवानीच्य नवरात्र उत्सवानिमित्त हजारो भाविक दर्शनासाठी येतात. तर शहर व ग्रामीण ठिकाणाहून आलेल्या भाविकांना मनोरंजनासाठी विविध खेळ व कार्यक्रम आयोजित केले जातात. यामधून ग्रामपंचायत संबंधित कार्यक्रम व खेळांसाठी एक लिलाव पद्धत वापरली जाते व त्या ठिकाणी ठेका देऊन सदरचे कार्यक्रम आयोजित केले जातात. ठेका घेणारा व्यक्ती हा ग्रामपंचायतीला संबंधित रक्कम अदा करतो व त्यातून ग्रामपंचायतीसह देवीचामाळ मंदिराला फायदा होताना दिसून येतो.

politics

मागील वेळी हाच ठेका अतिशय अल्प दरात गेल्यामुळे देवीचामाळ सह ग्रामपंचायतही नुकसान झालेलं दिसून आले होते. त्यामुळे यंदा पारदर्शक पद्धतीने लिलाव करून सदरचा ठेका देण्यात आला. परंतु एकाच वेळी दोन ठिकाणी मनोरंजनाचे खेळ आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. शिवाय एक वेगळी प्रथा पडू नये म्हणून ग्रामस्थांनी याला विरोध केला आहे. तर आपण लोकांच्या सोयीसाठी स्व. आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ मनोरंजनाचे खेळ आणत असून यामध्ये अल्प दरात लोकांना सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे चिवटे सांगत आहेत.

त्यामुळे नेमकं यामध्ये कोणाची बाजू घेऊन प्रशासन निर्णय देईल याकडे सर्वांचे लक्ष लागून असतानाच शनिवारी सदरच्या गाड्या करमाळ्यात आल्यानंतर त्यांना हुसकावून लावण्याचे काम ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलं. तर यासंबंधी महेश चिवटे यांनी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार ही दिली आहे. तर ग्रामस्थ व चिवटे यांच्या वादात प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

यंदा साडे दहा लाखाला ठेका ..
मागील दोन वर्षाच्या मानाने यंदा चांगला ठेका गेला असल्याने याचा फायदा ग्रामपंचायतीला होईल. सदर ठिकाणी २०२२ मध्ये दोन लाख रुपये तर २०२३ मध्ये केवळ ५५ हजार रुपये मिळाले होते. यामुळे ग्रामपंचायतीचेही नुकसान झाले होते यंदा या ठिकाणी ठेवा मोठ्याप्रमाणावर महागात गेला त्यामुळे ग्रामपंचायतीला साडे दहा लाखांचे वाढीव उत्पन्न मिळणार आहे. यातुन ग्रामपंचायत तीन लाखांची घंटा गाडी, तीन लाख विकास कामे व साडे चार लाख रुपये देवस्थानला देणार असल्याची माहीती ग्रामसेवक दत्तात्रय जाधव यांनी दिली आहे.

दोन ठिकाणी कशासाठी ? 
शिवसेना जिल्हा प्रमुखांचे राजकीय वजन असल्याने ते दबाव टाकुन दुसरा ठेका देत आहेत. यामुळे ग्रामपंचायतीचे नुकसान तसेच देवीचामाळ मंदीराचे नुकसान होणार आहे. यामुळे एकच ठेका असावा असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे आम्ही सर्व मिळुन याला विरोध करत राहु. प्रशासनाने आम्हाला ग्रामस्थांच्या भावनेचा विचार करु असे आश्वासन दिले आहे. त्याशिवाय प्रशासनाने विरोधात भुमिका घेतल्यास आमचा विरोध कायम राहणार आहे. आम्ही दुसरा ठेका चालुच देणार नाही.
प्रविण हिरगुडे, देवीचामाळ ग्रामस्थ.

गोळ्या घालण्याची धमकी ..
धर्मवीर आनंद दिघे फेस्टीवल च्या माध्यमातून केवळ पन्नास रुपयात पाळणा क इतर खेळ उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. यासाठी दहा मालट्रक वीट येथे आल्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे भितीमुळे ते लोक येत नाहीत. संबंधित लोकांना गोळ्या घालण्याची भाषा केली गेली. यामुळे धमकी देणाऱ्यांवर कारवाई करावी.
महे चिवटे, जिल्हाप्रमुख शिवसेना.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE