करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

बुलेट चोराला अटक – तपासात दुसरी गाडीही मिळवण्यात पोलिसांना यश

करमाळा समाचार

दि. २९/०९/२०२४ रोजी सायं. ०५/३० वा ते ०६/३० वाजता ए वन प्लाझा हॉटेल समोर, जातेगाव, ता. करमाळा येथून अच्युतराव काशिनाथ कामटे, रा. जातेगाव, ता. करमाळा जि सोलापूर यांचे मालकीची १,००,००० किंमतीची एक रॉयल इनफिल्ड बुलेट ३५० सीसी ची मोटार सायकल चोरीला गेली त्यानंतर दि. ०५/१०/२४ रोजी गुन्हा दाखल झाला होता.

करमाळा पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण मागील काही महिन्यापासून पोलीस ठाणेचे हद्दीमध्ये मोटारसायकल चोरीचे गुन्हे वारंवार घडत असल्याने मा. पोलीस अधीक्षक, श्री अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक, श्री. प्रिमत यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अजित पाटील, करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, श्री विनोद घुगे यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी आदेशीत केले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री विनोद घुगे यांचे मार्गर्शनाने पोलीस ठाणेकडील तपास पथकास सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी सुचना दिल्या होत्या.

politics

त्याप्रमाणे करमाळा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी मागावर असताना गोपनीय बातमीदार, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणा आधारे सदरचा गुन्हा हा आरोपी नामे प्रविण उर्फ पवन आंबादास सुरवसे, वय २७ वर्षे, रा. शिवाजी नगर, बीड रोड, जामखेड, ता. जामखेड, जि. अहमदनगर याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सदर आरोपी शोध कामी करमाळा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक रवाना झाले असता गोपनिय बातमीदारामार्फत सदर आरोपी हा मौजे दिसलेवाडी, ता. जामखेड येथे असल्याची माहीती मिळाली सदर माहीतीच्या अनुषंघाने बातमीतील नमुद ठिकाणी पथक गेले असता आरोपीस संशय आल्याने आरोपी मजकूर हा तेथून पळून गेला.

त्यानंतर त्याचा पाठलाग केला असता सदर आरोपीस भिगवण पोलीस ठाणे हददीतील मौजे शेटफळगडे येथे पकडून सदर गुन्हयात अटक करण्यात आले. तपासादरम्यान त्याच्याकडे सदर गुन्हयातील बुलेट मोटारसायकल बाबत चौकशी केली असता सदर मोटारसायकल जामखेड पोलीसांनी पकडली असून त्याचेविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे सांगीतले. तसेच आरोपी मजकूर याने जामगाव (आ) ता. बार्शी येथील हॉटेल मातोश्री समोरुन आणखी एक हीरो एच एफ डिलक्स कंपनीची मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल केल्याने सदर मोटारसायकल आरोपी मजकूर याचे ताब्यातून जप्त करण्यात आली आहे.

सदर मोटारसायकलबाबत अधीक तपास केला असता सदर मोटारसायकल चोरीबाबत बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे गुरनं. ३२५/२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल असलेबाबत माहीती मिळाली. सदर दोन्ही मोटारसायकल करमाळा पोलीस ठाणे येथे जप्त करण्यात आले असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ/७२२ आर. एस. राठोड हे करत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक, श्री. प्रिमत यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अजित पाटील, करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, श्री विनोद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकों / १६४८ अजित उबाळे, पोना / ११६२ मनिष पवार, पोना/९१२ वैभव ठेंगल, पोकॉ/११४३ सोमनाथ जगताप, पोकॉ/१७४८ ज्ञानेश्वर घोंगडे, पोकॉ/२१४२ गणेश शिंदे, पोकॉ/१५५० तौफीक काझी, पोकॉ/४३८ रविराज गटकुळ, पोकों / १६७ मिलींद दहीहांडे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोना/२२२ व्यंकटेश मोरे यांनी केली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE