दिग्विजय बागल यांच्यामध्ये बागल मामांची छबी ; कार्यकर्त्यात उत्साह
करमाळा समाचार
मागील काही दिवसांपूर्वी बागल गटाने युवा चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला व बागल गटात उत्साहाची नवी लाट पाहायला मिळत आहे. गावोगावी दिग्विजय बागल यांचा आदर सन्मान केला जात आहे. मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे. त्यांच्यामध्ये आम्हाला मामांची छबी दिसत असल्याचे कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे. ज्या पद्धतीने मामा आपुलकीने जवळ घ्यायचे मोठ्यांचा आदर करायचे तीच पद्धत दिग्विजय बागल यांच्याकडून दिसून येत असल्याने डिगा मामाच पुन्हा दारात आलेत का काय ? असा भास होत असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिग्विजय बागल यांनी गावोगावी जात भेटीगाठी घेणे सुरू केले होते. आजही त्या भेटीसाठी सुरू आहेत माजी आमदार स्व. दिगंबरराव बागल यांच्या कामाची पद्धत संपूर्ण तालुक्यातील पाहिली आहे. तर त्यांचा स्वभाव सामान्य लोकांचा मन जिंकणारा होता. त्यांच्या माध्यमातून जे माणसं जोडली गेली ते आज तागायत सत्ता नसतानाही बागल यांच्यासोबत जोडलेली आहेत. अनेकदा अनेक अडचणी आल्या पण आजही ते लोक बागल यांना सोडून गेल्याची दिसून येत नाही. याचा परिचय स्थानिक निवडणुकांमध्ये दिसून येतो.
सध्या बागल व सहकार्यांनी संपूर्ण तालुका पिंजून काढत नव्या दमाने सुरुवात केलेली आहे. अद्याप त्यांचा पक्ष किंवा चिन्ह ठरलेले नसतानाही प्रत्येक घरापर्यंत जाण्याचा मनसुबा त्यांच्याकडून ठेवण्यात आला आहे. याचा फायदा नक्कीच त्यांना होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान बागल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला व त्याचा लाभ ही त्यांना झाला. मकाई सहकारी साखर कारखान्याची देणे देण्यात त्यांना यश आले. तर कारखाना सुस्थितीत आणणे ध्येय असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे. पक्षाची अशीच साथ राहिली तर ते नक्कीच यशस्वी होतील.
सध्या विविध फॅक्टर व जाती-जातीमधील वाद यामुळे बराचसा विषय हा पक्ष विरोधी असल्याचे दिसून येत आहे. पण तालुक्यात स्व. दिगंबरराव बागल मामा व बागल गटाची वैयक्तिक जनतेशी असलेले नाळ यामुळे कार्यकर्ते बागल गटच आमचा पक्ष असल्याचे बोलत आहेत. त्यामुळे बागल कोणत्या गटातून उभा राहतात यापेक्षा बागल मामा यांची छबी असलेल्या नेत्याला पुन्हा एकदा मैदानात लढताना बघायचं आहे व त्यांना मतदान रुपी आशीर्वाद देण्याची इच्छा बोलून दाखवत आहेत. त्यामुळे बागल संपले म्हणणाऱ्यांना मोठा धक्का मानला जात आहे.