करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा बस स्थानाक परिसरात चोरी करणा-याच्या एकाला करमाळा पोलिसांनी पकडले

करमाळा समाचार

करमाळा बस स्थानाक परिसरात चोरी करणा-याच्या एकाला करमाळा पोलिसांनी पकडले आहे. तालुक्यातील दोन गुंह्यातील मुद्देमाल मिळुन आला आहे. सदरची कारवाई करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शन खाली गुंह्याची उकल केली आहे.

दि. २२/११/२०२४ रोजी दुपारी ०२/३० वा. च सुमारास फिर्यादी नामे शितल बभिषण रोडे, वयः ३५ वर्षे, रा. आळजापूर, ता. करमाळा या करमाळा बस सटॅन्ड येथुन त्याचे गावी आळजपूर येथे जाण्यासाठी एस. टी स्टॅन्डवर थांबल्या असताना कोणीतरी अज्ञात चारट्याने त्यांच्या पर्समधील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठन, ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, ९ गॅम वजनाचे फुले-झुबे व ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन असे एकूण २,३०,०००/- रु. किंमतीचे दागीने चोरी केल्याबाबत गुन्हा दाखल आहे, तसेच दि. २४/११, २०२४ रोजी दुपारी ०२:०० वा. चे सुमारास वृध्द महिला नामे छाया बंडेश पांढरे, वय ७० वर्षे, रा. सोलापूर या करमाळा ते कुडुवाडी बसने प्रवास करीत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने गर्दीचा फायदा घेवुन त्यांच्या उजव्या हातातील १५ ग्रॅम वजनाची सोन्यवी पाटली हातातुन काढून चोरी केली त्याबाबत करमाळा पोलीस गुन्हा दाखल आहे.

politics

करमाळा पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण हद्दीमध्ये मागील काही महिन्यापासून चोरीचे गुन्हे वारंवार घडत असल्याने मा. पोलीस अधीक्षक, श्री अतुल कुलकर्णी (भा पो से), मा अपर पोलीस अधीक्षक, श्री. प्रिमत यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अजित पाटील, करमाळा उपविभाग यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी आदेशीत केले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री विनोद घुगे यांचे मार्गर्शनाने पोलीस ठाणेकडील तपास पथकास सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी सुचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे करमाळा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी मागावर असताना गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाआधारे सदरचा गुन्हा हा आरोपी नामे सोमनाथ दिलीप काळे, वय २३ वर्षे, रा. थेरगाव, ता कर्जत, जि. अहमदनगर याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सदर आरोपी शोध कामी करमाळा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक रवाना झाले असता गोपनिय बातमीदारामार्फत सदर आरोपी हा मौजे थेरगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर येथे असल्याची माहीती मिळाली सदर माहीतीच्या अनुषंगाने बातमीतील नमुद ठिकाणी पथक गेले असता दोन दिवस आरोपीचा माग घेत पोलीस पथक सदर गावामध्ये थांबुन आरोपी यास पकडून सदर गुन्हयात अटक करण्यात आले तपासादरम्यान त्याव्याकडे सदर गुन्हयातील गेले मालाबाबत चौकशी केली असता आरोपीने चोरलेल्या मालापैकी २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन व ९ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलस असा एकुण १,४५,०००/- रु किंमतीचे दागीने तसेच दुसऱ्या गुन्हयातील अंदाजे ५०,०००/- रु किंमतीची १५ ग्रॅम वजनाची एक सोन्याची पाटली असे एकुण १,९५,०००/- रु. किंमतीचे सोन्याचे दागीने काढुन दिले आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो ना ठेंगल व पो हवा उबाळे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी (भा पो से) अपर पोलीस अधीक्षक, श्री प्रिमत यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अजित पाटील करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, श्री विनोद घुगे याचे मार्गदर्शनाखाली पात्रको अजित उबाळ पोना वैभव ठेंगल, पोना मनिष पवार, पोको तौफीक काझी पाकॉ ज्ञानेश्वर चवोंगडे, पोकों गणेश शिंदे पोकों रविराज गटकुळ, पोकों सोमनाथ जगताप तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोना व्यंकटेश मोरे यांनी केली आहे

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE