करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

शिवसेनेच्या भुमिकेमुळे करमाळ्यातही चित्र बदलणार ; कॉग्रेस, शिवसेनेला चाचपणीची संधी

करमाळा समाचार

महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे शिवसेना गट यांच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याचे जाहीर केल्यानंतर तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांनाही एक कामाची संधी असल्याचे दिसून येत आहे. आघाडीच्या माध्यमातून दिलेल्या जागेमुळे इतर पक्षांना आपली ताकद आजमावता येत नव्हती. ती ताकद बघण्याची आता संधी निर्माण होत आहे. त्या संधीचं पदाधिकाऱ्यांनी सोनं करणं गरजेचं आहे.

तालुक्याच्या राजकारणात उमेदवारी नसल्याने इतर पक्षांची वाढ खुंटलेली दिसून आली. ज्या पक्षाला उमेदवारी मिळू शकते त्या पक्षाकडे तुल्यबळ उमेदवाराचा भरणा वाढत असल्याचे दिसून येत होते. पक्षांमध्ये कायम संघर्ष करणारे व एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते कायम असल्याचे दिसून आले. पण उमेदवारी ही मित्र पक्षाला मिळत असल्याने इतर संघटना मात्र वाढताना दिसून येत नव्हत्या. पण आता या प्रकारामुळे त्या पक्षांनाही संधी मिळत असल्याचे दिसत आहे.

politics

सध्या महाविकास आघाडी मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांचे पक्षाकडून विद्यमान आमदार नारायण पाटील हे राष्ट्रवादीचे काम पाहतात. तर शिवसेनेकडून सुधाकर लावंड, शाहू फडतडे, प्रवीण कटारिया यासह तळागाळातील कार्यकर्त्यांपासून दुसऱ्या फळीतील नेते काम करताना दिसतात. तर काँग्रेस कडून प्रताप जगताप व आजी-माजी पदाधिकारी हे काँग्रेस मधून काम करताना दिसतात.

मुळातच करमाळा तालुक्याचे राजकारण स्व. नामदेवरावजी जगताप यांच्या माध्यमातून काँग्रेसची सत्ता बराच काळ राहिलेली असताना सध्या काँग्रेस तालुक्यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्याही कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा एक संधी उपलब्ध होताना दिसेल. यामुळे शिवसेनेने घेतलेल्या निर्णयामुळे तालुक्यात ताकद वाढवणे व तालुक्यात आपली ताकद काय आहे हे जाणुन घेण्याची चांगली संधी आहे.

तालुक्याचे राजकारण कायम गटातटावर अवलंबून असल्याने शिवसेनेने घेतलेल्या निर्णयामुळे महाविकास आघाडीत विभागणी जरी झाली तरी स्थानिक निवडणुकांवर तितकासा प्रभाव पडणार नाही असे दिसते. तर महायुती कोणती भुमिका घेते त्यावर निवडणुकांची दिशा ठरु शकेल.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE