लोकसभेतील पीछेहाट झाल्यानंतर फडणवीस, पवार घाबरले त्यामुळे… – शिवसेनेच्या चिवटेंकडुन खंत व्यक्त
करमाळा समाचार
शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद न मिळाल्याची सल करमाळ्यात जिल्हाप्रमुख यांनी बोलून दाखवली. लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुका मुख्यमंत्री शिंदे यांना चेहरा करून लढवल्या तरी बहुमत मिळाल्यानंतर त्यांना पद दिले नसल्याची खंत यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी बोलून दाखवल्याने हा विषय चर्चेचा ठरत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने ४०७ महिला बांधकाम कामगारांना अधिकृत नोंदणी कार्ड देण्यात आले यावेळी ते बोलत होते.

लोकसभेत महायुतीची पीछेहाट झाल्यानंतर महायुतीने राज्यातील विधानसभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व चेहरा पुढे करून लढवली. राज्यातील मराठा आंदोलन पासून ते लाडके बहिणीमुळे व वैद्यकीय मदतीमुळे एकनाथ शिंदे यांच्या बद्दल महाराष्ट्रात सहानभूती तयार झाली होती या सहानुभूतीच्या लाटेवर महायुतीला भक्कम यश मिळाले. मात्र मुख्यमंत्री नेमताना एकनाथ शिंदे यांना दूर ठेवले. हे महाराष्ट्रातील तमाम सर्वसामान्य जनतेला व लाडक्या बहिणींना पटलेले नाही. त्यामुळे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत असे चिवटे म्हणाले.
संवेदनशील मुख्यमंत्री यांची छबी महाराष्ट्रात पूर्णपणे लोकप्रिय झाली होती. लोकसभेत झालेल्या दारुण पराभवामुळे भाजपचे देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीच्या अजित दादा पवार घाबरून गेले होते. यामुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील अशी जाहीर केले. खुद्द देवेंद्र फडणवीस सुद्धा निवडणुकीच्या प्रचारात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असल्याचे जाहीरपणे सांगत होते. केवळ एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यातील मराठा समाज व लाडक्या बहिणी महायुतीच्या सरकारच्या पाठीमागे उभा राहिले. कारण मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे विराजमान होतील अशी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला अशा होती. मात्र प्रचंड बहुमत मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे यांना बाजूला करण्यात आले. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या मनात चीड निर्माण असून जनतेच्या मनातील खरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे असे चिवटे यांनी बोलुन दाखवले.

यावेळी व्यासपीठावर यश कल्याणी संस्थेचे चेअरमन गणेश करे, पिंपळवाडीचे माजी सरपंच विश्वास काळे पाटील, शहर प्रमुख संजय शीलवंत, माजी तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, एमआयडीसी संचालक आर आर पाटील, करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपासे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – मुख्याधिकारी…
करमाळा देवीचामाळ रोड लगत एकनाथ शिंदे ऑक्सिजन पार्क उभा करण्यात येत असून ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी दोनशे ऑक्सिजन देणारी वडाची झाडे लावण्यात येणार आहेत. या कामाची सुरुवात मुख्याधिकारी सचिन तपासे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी अतिक्रमण करणाऱ्यांना तपासे यांनी अवैध गाळे काढावीत अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा देत असताना मनातले मुख्यमंत्री शिंदेंच असल्याचे वक्तव्य केले.