जेऊर येथील पोस्ट ऑफिसला आग ; पत्र्यातुन धुरीचे लोट
करमाळा समाचार
जेऊर तालुका करमाळा येथील पोस्ट ऑफिसला आग लागल्याने त्या ठिकाणी अग्निशामक दलाची गाडी बोलवण्यात आली आहे. ऑफिसमध्ये असलेला सर्व कागदपत्रे वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर आज महावीर जयंती असल्याने कार्यालयाला सुट्टी होती. त्यामुळे सुदैवाने कोणताही कर्मचारी किंवा ग्राहक आत नव्हते. परंतु आग एवढी मोठी होती की त्या ठिकाणी कागदपत्रे वाचवणे सध्या तरी शक्य दिसून येत नाही.

जेऊर येथील प्रमुख पोस्ट ऑफिस कार्यालयात आग लागल्यानंतर करमाळ्याहून नगरपरिषदेच्या गाडीला सांगण्यात आले. त्यानंतर नगरपरिषदेच्या वतीने अग्निशामक दलाची गाडी सदर ठिकाणी पोहोच झाली आहे. आग विजवण्याचे काम सुरू आहे. आज सुट्टी असल्याने आग लागलेली माहिती उशिरा लक्षात आली. त्याशिवाय कर्मचारी नसल्याने इतर गर्दी ही त्या ठिकाणी नव्हती. त्यामुळे इतर कोणतीही हानी या ठिकाणी झालेली नाही.
